Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 1:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा;1 अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 चांगले करण्यास शिका; न्याय मिळवा, पीडितांची मदत करा, पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या. पीडितांचे संरक्षण करा. पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा; विधवांची बाजू मांडा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 1:17
24 Iomraidhean Croise  

वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर.


उपर्‍याला छळू नकोस किंवा त्याच्यावर जुलूम करू नकोस, कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता.


परमेश्वर गर्विष्ठाचे घर जमीनदोस्त करतो, पण विधवेची मेर कायम राखतो.


नीतिमत्तेने व न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे.


आपले मुख उघड, नीतिमत्त्वाने न्याय कर; गरीब व कंगाल ह्यांना न्याय मिळू दे.


तुझे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत; त्यांतील प्रत्येकाला लाचांची आवड आहे. प्रत्येक जण नजराण्यांमागे लागणारा आहे; ते अनाथाचा न्याय करत नाहीत, विधवेची दाद घेत नाहीत.


ते दाद मागणार्‍या दुबळ्यांना धुडकावून लावतात व माझ्या प्रजेतल्या गरिबांचे हक्क बुडवतात; ते विधवांना लुटतात व पोरक्यांना नागवतात.


परमेश्वर म्हणतो, “न्यायाचे पालन करा, नीतीचे आचरण करा; कारण माझे तारण जवळ आले आहे. माझे न्याय्यत्व प्रकट होण्यास आले आहे.


दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोर्‍या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय?


‘परमेश्वर म्हणतो, हे दावीदघराण्या, रोज सकाळी न्यायनिवाडा कर; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडव; नाहीतर तुझ्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा संताप अग्नीसारखा भडकेल. तो कोणाच्याने विझवणार नाही.”’


परमेश्वर म्हणतो : तुम्ही न्यायनिवाडा करा; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडवा; परका, पोरका व विधवा ह्यांच्यावर अन्याय करू नका; त्यांना उपद्रव देऊ नका; ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडू नका.


मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.


तुम्ही आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या; आपल्या ठायी नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा; हे इस्राएल घराण्या, तुम्ही का मरता?


तुझ्या ठायी लोक आईबापांना तुच्छ मानतात, तुझ्या ठायी ते परदेशीयांवर जुलूम करतात, तुझ्या ठायी ते अनाथ व विधवा ह्यांना जाचतात.


प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएलाच्या अधिपतींनो, झाले ते पुरे; आता तुम्ही बलात्कार व जुलूम ह्यांपासून दूर राहा, न्याय व नीती ह्यांचे पालन करा, आणि माझ्या लोकांना त्यांच्या वतनांतून घालवून देण्याचे सोडा, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील.”


हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?


देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणार्‍यांनो, त्याचा आश्रय करा, नीतिमत्ता व नम्रता ह्याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.


तुम्ही करायचे ते हेच की, तुम्ही सर्व आपल्या शेजार्‍याबरोबर खरे बोला; आपल्या वेशीत खरेपणाने वागा व शांतिदायक न्याय करा;


आणि लेव्याला तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही म्हणून त्याने आणि तुझ्या गावातला उपरा, अनाथ व विधवा ह्यांनीही येऊन पोटभर खावे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल.


देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan