Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 1:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनेत हात पसरता, तेव्हा मी आपले डोळे तुम्हापासून झाकीन; जरी तुम्ही पुष्कळ प्रार्थना केल्या, तरीही मी त्या ऐकणार नाही; तुमचे हात निष्पापांच्या घाताच्या रक्ताने पूर्णपणे भरले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 1:15
36 Iomraidhean Croise  

शलमोनाने इस्राएलाच्या सर्व मंडळीदेखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून आकाशाकडे हात पसरले;


शलमोनाने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वराला करण्याचे संपवल्यावर तो तेथून उठला.


उपोषण केलेला, वस्त्र व झगा फाडलेला, अशा स्थितीत मी संध्याकाळच्या अर्पणसमयी उठलो आणि गुडघे टेकून माझा देव परमेश्वर ह्याच्यापुढे आपले हात पसरून म्हणालो,


घोर संकटे पुराप्रमाणे त्याच्यावर गुदरतात; रात्रीच्या समयी तुफान त्याला उडवून नेते.


देव निरर्थक ओरड खरोखर ऐकत नाही; सर्वसमर्थ तिच्याकडे लक्ष देत नाही.


पवित्रस्थानाकडे वळून आपले बाहू उभारा, आणि परमेश्वराचा धन्यवाद करा;


हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे; माझ्या विनंतीपासून तोंड फिरवू नकोस.


माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता;


मोशे त्याला म्हणाला, “मी नगराबाहेर गेलो की परमेश्वराकडे आपले हात पसरीन तेव्हा मेघगर्जना बंद होईल व गारा पडायच्या नाहीत; ह्यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.


तेव्हा ते मला हाक मारतील; पण मी उत्तर देणार नाही; ते मला आसक्तीने शोधतील, पण मी त्यांना सापडणार नाही;


उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात,


प्रभू न्याय करणार्‍या व दहन करणार्‍या आत्म्याच्या द्वारे सीयोनेच्या कन्यांचा मळ काढून टाकील, आणि यरुशलेमेतून तिचा रक्तदोष काढून टाकील, तेव्हा असे घडेल.


हे इस्राएलाच्या देवा, तारका, तू खचीत गूढ देव आहेस.


पाहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्या वेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता; तुमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा ह्यासाठी तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही.


तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे; तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय?


तुझ्या धावा करणारा कोणी नाही; तुझा आश्रय करण्यासाठी कोणी स्वतःला जागृत करीत नाही; कारण तू आपले मुख आमच्यापासून लपवले आहेस; आमच्या अधर्माच्या योगानेच तू आम्हांला भस्म केले आहेस.


परमेश्वर याकोबाच्या घराण्यापासून आपले मुख फिरवतो; त्याची वाट मी पाहतो, त्याची आशा धरतो,


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, मी त्यांच्यावर अरिष्ट आणतो त्यातून त्यांचा निभाव लागणार नाही; ते मला आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही.


ते उपोषण करतील तेव्हा मी त्यांची आरोळी ऐकणार नाही; ते होमार्पण व अन्नार्पण मला आणतील ती मी स्वीकारणार नाही; मी तलवारीने, दुष्काळाने व मरीने त्यांचा संहार करीन.”


वेणा देणार्‍या स्त्रीच्या शब्दासारखा शब्द मी ऐकत आहे; प्रथम प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे वेदना ऐकत आहे; सीयोनेच्या कन्येचा स्वर ऐकू येत आहे; ती उसासे टाकत आहे, ती आपले हात पसरत आहे; ती म्हणत आहे, “हाय रे हाय! कारण ह्या मनुष्यघातक्यापुढे माझा जीव घाबरा होत आहे.”


तुम्ही ह्या नगरात अनेकांना वधले, त्यातले रस्ते प्रेतांनी भरून टाकले.


“मानवपुत्रा, ह्या मनुष्यांनी आपल्या हृदयांत आपल्या मूर्ती वागवल्या आहेत; त्यांनी आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवले आहे; अशा लोकांना मी आपल्याला प्रश्‍न विचारू देईन काय?


राष्ट्रांना समजेल की इस्राएल घराण्यातील लोक आपल्या दुष्टतेमुळे बंदिवासात गेले; त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला म्हणून मी त्यांच्यापासून आपले मुख लपवले आणि त्यांना त्यांच्या वैर्‍यांच्या हवाली केले, तेव्हा ते सर्व तलवारीने पडले.


ते आपली मेंढरे व गुरे घेऊन परमेश्वराचा आश्रय करण्यास येतील, पण तो त्यांना सापडणार नाही, तो त्यांना अंतरला आहे.


तेव्हा ते परमेश्वराला आरोळी मारतील तरी तो त्यांचे ऐकणार नाही; तो त्या वेळेस त्यांना पराङ्मुख होईल, कारण त्यांनी दुष्कृत्ये केली आहेत.


तेव्हा असे झाले की, “मी हाक मारीत असता त्यांनी ऐकले नाही, म्हणून ते हाक मारतील तरी मी ऐकणार नाही,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका; आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते.


आपल्याला ठाऊक आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो.


प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan