Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण ह्यांचा द्वेष करतो; त्यांचा मला भार झाला आहे; तो सोसून मी थकलो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तुमची चंद्रदर्शने व तुम्ही नेमलेले सण यांचा माझा जीव द्वेष करतो; त्यांचे मला ओझे झाले आहे; तो सहन करून मी थकलो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तुमचे अमावस्याचे उत्सव आणि तुमचे नेमलेले सण यांचा मी माझ्या संपूर्णतेने तिरस्कार करतो. ते मला भार असे झाले आहेत; त्यांना सहन करता मी थकून गेलो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 1:14
13 Iomraidhean Croise  

तसेच शब्बाथाच्या व चंद्रदर्शनाच्या दिवशी व नेमलेल्या पर्वणीस ठरवलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरासमोर उभे राहून सर्व होमबली त्यांना त्यास अर्पावे लागत.


अरीएल1 ह्याला धिक्कार असो! दाविदाने तळ दिलेले अरीएल नगर ह्याला धिक्कार असो! ह्या वर्षात आणखी एक वर्ष मिळवा, सणांचा एक फेरा होऊ द्या.


मग मी अरीएलांवर संकट आणीन; शोक व कण्हणे चालू होईल. तरीपण ते नगर मला अरीएलच असे होईल.


तू पैसे देऊन माझ्यासाठी अगरू विकत घेतला नाहीस, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस; तर तू आपल्या पातकांची माझ्यावर सक्ती केलीस, तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिणवलेस.


“कारण मला, परमेश्वराला न्याय प्रिय आहे, अन्यायाच्या लुटीचा मला वीट आहे; मी त्यांना खातरीने प्रतिफळ देईन; त्यांच्याशी सार्वकालिक करार करीन.


असे होईल की, एका चंद्रदर्शनापासून दुसर्‍या चंद्रदर्शनापर्यंत, एका शब्बाथापासून दुसर्‍या शब्बाथापर्यंत सर्व मनुष्यजाती माझ्यापुढे भजनपूजन करण्यास येईल, असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा तो म्हणाला, “हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक : तुम्ही मनुष्याला कंटाळा आणता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळवता काय?


तिचे सर्व उत्सव, तिच्या यात्रा, तिची चंद्रदर्शने, तिचे शब्बाथ व तिचे सर्व नेमलेले सण मी बंद करीन.


ते परमेश्वराबरोबर बेइमान झाले आहेत, कारण त्यांना झालेली मुले परकी आहेत; आता चंद्रदर्शन होताच ते आपल्या वतनभागांसह गडप होतील.


ह्यामुळे पाहा, धान्याच्या पेंढ्यांनी गच्च भरलेला गाडा जसा खाली दबतो तसे मी तुम्हांला दाबीन.


“तुमच्या उत्सवांचा मला तिटकारा आहे, मी ते तुच्छ मानतो; तुमच्या पवित्र मेळ्यांचा वासही मला खपत नाही.


मी एका महिन्यात तीन मेंढपाळ कापून टाकले, कारण माझ्या जिवाला त्यांचा कंटाळा आला व त्यांच्या जिवास माझा कंटाळा आला.


तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणला आहे, तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला?’ तुम्ही म्हणता, ‘प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्यासंबंधाने संतुष्ट असतो, नाहीतर न्याय करणारा देव आहे कुठे?’ अशाने तुम्ही त्याला कंटाळा आणला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan