Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 निरर्थक अर्पणे आणखी आणू नका; धूपाचा मला वीट आहे; चंद्रदर्शन, शब्बाथ व मेळे भरवणे मला खपत नाही; सणाचा मेळा हाही अधर्मच होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका; धुपाचा मला तिटकारा आहे. तुमचे नवचंद्रदर्शन व शब्बाथ मेळे, असे पापी मेळे मी खपवून घेत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 अर्थशून्य अर्पणे आणणे बंद करा! तुमच्या सुगंधी धूपाचा मला तिटकारा वाटतो. नवचंद्र उत्सव, शब्बाथ आणि समारंभ— अशा तुमच्या निरर्थक सभा मी सहन करू शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 1:13
25 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “तू आज त्याच्याकडे का चाललीस? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.” ती म्हणाली, “काही चिंता नाही.”


तसेच शब्बाथाच्या व चंद्रदर्शनाच्या दिवशी व नेमलेल्या पर्वणीस ठरवलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरासमोर उभे राहून सर्व होमबली त्यांना त्यास अर्पावे लागत.


कितीतरी वेळा त्यांनी रानात त्याच्याविरुद्ध बंडाळी केली! कितीतरी वेळा त्यांनी अरण्यात त्याला दुःख दिले!


पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; तसाच सातव्या दिवशीही पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी काही काम करू नये; मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्या-पिण्यासंबंधाने जे काही करायचे असेल ते करावे.


दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार?


“मला शांत्यर्पणे करायची होती; मी आपले नवस आज फेडून चुकले.


असे होईल की, एका चंद्रदर्शनापासून दुसर्‍या चंद्रदर्शनापर्यंत, एका शब्बाथापासून दुसर्‍या शब्बाथापर्यंत सर्व मनुष्यजाती माझ्यापुढे भजनपूजन करण्यास येईल, असे परमेश्वर म्हणतो.


जो बैल कापतो तो मनुष्यवध करणारा होय; जो मेंढ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान मोडणारा होय; जो अन्नार्पण करतो तो डुकराचे रक्त अर्पण करणारा होय; जो धूप दाखवतो तो मूर्तीचा धन्यवाद करणारा होय; ज्या अर्थी त्यांनी आपलेच मार्ग पसंत केले आहेत व अमंगळ पदार्थांनी त्यांचा जीव संतुष्ट होतो,


बागेतला मांडव उद्ध्वस्त करावा त्याप्रमाणे त्याने आपला मांडव उद्ध्वस्त केला आहे; त्याने आपल्या सभास्थानाचा विध्वंस केला आहे; परमेश्वराने, सण व शब्बाथ ह्यांचा सीयोनेत विसर पाडला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाने राजा व याजक ह्यांचा धिक्कार केला आहे.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएल घराण्या, जा, आपल्या हव्या त्या मूर्तीची पूजा कर; पण पुढे तुम्ही खरोखर माझे ऐकाल, आणि आपल्या अर्पणांनी व मूर्तींनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावणार नाही.


तिचे सर्व उत्सव, तिच्या यात्रा, तिची चंद्रदर्शने, तिचे शब्बाथ व तिचे सर्व नेमलेले सण मी बंद करीन.


उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात वडिलांना व देशात राहणार्‍या सर्वांना जमवा व परमेश्वराला आरोळी मारा.


सीयोनात कर्णा वाजवा; उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा.


मी तुमची नगरे उजाड करीन, तुमची पवित्रस्थळे ओसाड करीन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा वास मी घेणार नाही.


तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक अग्नी पेटवू नये म्हणून तुमच्यातला कोणी दरवाजे बंद करील तर बरे! तुमच्यात मला मुळीच संतोष नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; तुमच्या हातचे यज्ञार्पण मी मान्य करून घेणार नाही.


“तू चांदीचे दोन कर्णे बनव; ते घडीव कामाचे असावेत; मंडळीला बोलावण्यासाठी आणि तळ उठवण्यासाठी त्यांचा तू उपयोग करावास.


ते व्यर्थ माझी उपासना करतात; कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम.”’


परंतु तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय व देवाची प्रीती ह्यांकडे दुर्लक्ष करता; ह्या गोष्टी करायच्या होत्या, व त्या सोडायच्या नव्हत्या.


आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते.


देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात.


कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात; आणि कित्येक सद्भावाने करतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan