Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 9:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 समाचार घेण्याचे दिवस आले आहेत; प्रतिफळाचे दिवस आले आहेत; इस्राएलास हे समजून येईल; तुझ्या पापांच्या राशीमुळे, तुझ्या अति वैरामुळे, संदेष्टा मूर्ख असा बनला आहे, आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 शासन करण्याचे दिवस येत आहेत, प्रतिफळाचे दिवस येत आहेत, इस्राएल हे जाणणार, तुझ्या महापातकामुळे, वैरभावामुळे आता संदेष्टा मूर्ख बनला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 शासन करण्याची वेळ जवळ आली आहे; प्रतिफळ घेण्याचे दिवस जवळ आले आहेत. इस्राएलला हे समजून यावे. कारण तुमची पापे अधिक आहेत आणि तुमचे शत्रुत्व जास्त आहे, संदेष्टा मूर्ख ठरत आहे, प्रेरित वेडा समजला जातो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 9:7
40 Iomraidhean Croise  

येहू बाहेर आपल्या धन्याच्या सेवकांकडे आला तेव्हा एकाने त्याला विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना? तो वेडा तुझ्याकडे का आला होता?” तो त्यांना म्हणाला, “तो मनुष्य कोण व त्याचा संदेश काय हे तुम्हांला माहीत आहेच.”


पारिपत्याच्या दिवशी व दुरून नाशकारक वादळ येईल तेव्हा काय कराल? तुम्ही साहाय्यार्थ कोणाकडे धाव घ्याल? आपले ऐश्वर्य कोठे ठेवून जाल?


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


सीयोनेला न्याय मिळावा म्हणून सूड घेण्याचा हा परमेश्वराचा दिवस, प्रतिफळ देण्याचे हे वर्ष होय.


खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे.


त्या शून्य, उपहासाला पात्र वस्तू होत; त्यांचा समाचार घेऊ लागताच त्या नष्ट होतात.


त्यांतला कोणी शेष उरणार नाही, कारण अनाथोथ-करांवर मी अरिष्ट, त्यांची खबर घेण्याचा वर्षकाळ आणतो.”


प्रथमत: त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप ह्यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यांना देईन; कारण त्यांनी आपल्या प्रेतवत व अमंगळ मूर्तींनी माझा देश भ्रष्ट केला आहे. त्यांनी आपल्या किळसवाण्या वस्तूंनी माझे वतन भरले आहे.”


शोमरोनातील संदेष्ट्यांच्या ठायी मी मूर्खपणा पाहिला आहे; त्यांनी बआलदैवतांच्या नावाने भाषणे करून माझे लोक इस्राएल ह्यांना बहकवले आहे.


त्यांच्याकडूनही अनेक राष्ट्रे व थोर राजे दास्य करवून घेतील; मी त्यांच्या कृतींप्रमाणे व त्यांच्या हातच्या कर्मांप्रमाणे त्यांना प्रतिफळ देईन.


“परमेश्वराच्या मंदिरात आपण कारभारी व्हावे आणि जो कोणी वेडा होऊन आपणांला संदेष्टा म्हणतो त्याला खोड्यात घालून बेड्या घालाव्यात म्हणून परमेश्वराने यहोयादा याजकाच्या जागी तुला याजक केले आहे.


तिचे भाडोत्री शिपाईही तिच्यामध्ये लठ्ठ वासरांसारखे आहेत; ते आपली पाठ फिरवून सगळेच पळून जातात; ते तोंड देत नाहीत, कारण त्यांच्या नाशाचा दिवस, त्यांच्या पारिपत्याचा समय त्यांच्यावर आला आहे.


शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करतात.


शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांच्या कन्येचा घाय ते वरवर बरा करतात.


तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला; तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही; तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.


ह्याचे कारण हेच की त्यांनी माझ्या लोकांना बहकवले आहे, शांती नसता ‘शांती आहे’ असे त्यांनी म्हटले आहे आणि माझे लोक तट बांधत असता, पाहा, त्याला ते कच्चा चुना लिंपीत आहेत.


प्रभू परमेश्वर म्हणतो, जे मूर्ख संदेष्टे दृष्टान्त पाहिल्यावाचून आपल्याच मनातील संदेश देतात ते हायहाय करोत.


त्यांना संतापाने शिक्षा करून मी त्यांचा भयंकर सूड घेईन; मी त्यांच्यावर सूड उगवीन तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”


ह्या प्रकारे मी आपला महिमा व पवित्रता प्रकट करीन, आणि बहुत राष्ट्रांना माझी प्रत्यक्ष ओळख होईल; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.


मी तर कृपादृष्टी करणार नाही, गय करणार नाही, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्या शिरी लादीन.”


हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस.


शासनाच्या दिवशी एफ्राईम ओसाड होईल; ही खातरीने होणारी गोष्ट मी इस्राएलाच्या वंशांना कळवली आहे.


त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय; पण ती परमेश्वर स्वीकारत नाही; आता तो त्यांचा अधर्म स्मरेल व त्यांच्या पापाचे शासन करील; ते मिसरास परत जातील.


एफ्राईम माझ्या देवाला हेरणारा आहे; संदेष्टा आपल्या सर्व मार्गांत पारध्याचा फासा आहे; त्याच्या देवाच्या मंदिरात वैरभाव आहे.


तो म्हणाला, आमोसा, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “पक्‍व फळांची पाटी.” मग परमेश्वर म्हणाला, “माझे लोक इस्राएल ह्यांचा अंतसमय आला आहे; ह्यापुढे मी त्यांची गय करणार नाही.”


वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल.


त्यांच्यातला जो उत्तम तो काटेरी झुडपासारखा आहे; त्यांच्यातला जो सरळ तो काटेरी कुंपणाहून वाईट आहे; तुझ्या टेहळणी करणार्‍यांनी टेहळलेला दिवस, तुझी झडती घेण्याचा दिवस येत आहे; आता त्यांची त्रेधा उडेल.


तिचे संदेष्टे बढाईखोर व विश्वासघातकी आहेत; तिचे याजक पवित्रस्थान भ्रष्ट करतात, त्यांनी नियमशास्त्राचे अतिक्रमण केले आहे.


हे ऐकून त्याचे आप्त त्याला धरायला निघाले; कारण “त्याला वेड लागले आहे” असे त्यांचे म्हणणे होते.


कारण शास्त्रलेखांतल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे ‘सूड घेण्याचे दिवस’ आहेत.


आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तर ते देवासाठी, आणि आम्ही शुद्धीवर असलो तर ते तुमच्यासाठी आहोत.


मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले; राष्ट्रांची नगरे कोसळली. तेव्हा देवाने आपला ‘तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला’ द्यावा, म्हणून त्याच्यासमोर तिचे स्मरण करण्यात आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan