Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 9:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ते परमेश्वराच्या देशात राहायचे नाहीत; एफ्राईम मिसर देशास परत जाईल; ते अश्शूरच्या देशात अमंगल पदार्थ भक्षण करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ते परमेश्वराच्या देशात राहणार नाहीत, त्याशिवाय एफ्राईम मिसरात परत जाईल, आणि एके दिवशी ते अश्शूरात अमंगळ पदार्थ खातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेहच्या देशात ते राहणार नाहीत; एफ्राईम इजिप्त देशात परत जाईल आणि अश्शूर येथे अशुद्ध भोजन खाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 9:3
24 Iomraidhean Croise  

जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यातून त्यांचा उच्छेद करीन आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाकरता पवित्र केले आहे ते माझ्या नजरेआड करीन, तसेच इस्राएल लोक इतर सर्व राष्ट्रांत दृष्टान्ताचा व निंदेचा विषय होतील.


होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूराच्या राजाने शोमरोन सर केले व इस्राएल लोकांना अश्शूर देशात नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांतून वसवले.


प्रथमत: त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप ह्यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यांना देईन; कारण त्यांनी आपल्या प्रेतवत व अमंगळ मूर्तींनी माझा देश भ्रष्ट केला आहे. त्यांनी आपल्या किळसवाण्या वस्तूंनी माझे वतन भरले आहे.”


मी तुम्हांला सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी व तिची संपत्ती भोगण्यासाठी आणले, पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला, माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे.


आमच्या पोटाला भाकर मिळण्यासाठी, आम्ही मिसरी लोकांकडे, अश्शूरी लोकांकडे हात पसरतो.


परमेश्वर म्हणाला, “ह्याप्रमाणे मी इस्राएल वंशजांना ज्या राष्ट्रांमध्ये हाकून देईन त्यांत ते आपली अमंगळ भाकर खातील.”


राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस ह्यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्‍चय केला; म्हणून त्याने खोजांच्या सरदाराला विनंती केली की मला ह्यांचा विटाळ नसावा.


मिसर देशातून पक्षी व अश्शूर देशातून पारवे येतात तसे ते थरथर कापत येतील, व मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन, असे परमेश्वर म्हणतो.


ते मिसर देशात परत जाणार नाहीत, तर अश्शूर त्यांचा राजा होईल; कारण ते माझ्याकडे परत येण्यास मान्य झाले नाहीत.


एफ्राईम एखाद्या खुळ्या निर्बुद्ध पारव्यासारखा आहे; ते मिसराला हाक मारतात; अश्शूराकडे धाव घेतात.


ते परत येतात, पण परात्पराकडे नव्हे; ते फसवणार्‍या धनुष्यासारखे झाले आहेत; त्यांचे सरदार आपल्या जिव्हेच्या उद्दामपणामुळे तलवारीने पडतील; ह्यामुळे त्यांची मिसर देशात अप्रतिष्ठा होईल.


त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय; पण ती परमेश्वर स्वीकारत नाही; आता तो त्यांचा अधर्म स्मरेल व त्यांच्या पापाचे शासन करील; ते मिसरास परत जातील.


कारण पाहा, विध्वंस झाल्यामुळे ते निघून गेले आहेत; मिसर त्यांना गोळा करील, मोफ त्यांना मूठमाती देईल; काटेकुसळे त्यांच्या रुपेरी मौल्यवान पदार्थांचा ताबा घेतील, त्यांच्या तंबूत काटेरी झुडपे रुजतील.


तुमच्यापूर्वीच्या राष्ट्रांचा जसा ह्या देशाने त्याग केला2 तसा तुम्ही देश भ्रष्ट केल्यास तुमचाही त्याने त्याग करू नये.3


म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम मान्य करून पाळावेत म्हणजे ज्या देशात वसाहत करण्यासाठी मी तुम्हांला घेऊन जात आहे तो तुमचा त्याग करणार नाही.


जमीन विकायची तर ती कायमची विकून टाकू नका, कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरे आहात;


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो की, “तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र व तुझ्या कन्या तलवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील, आणि इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने बंदिवान करून नेतील.”


उठा, चालते व्हा, हे तुमचे विश्रांतिस्थान नव्हे; कारण अशुद्धतेने नाश, समूळ नाश होईल.


पेत्र म्हणाला, “नको, नको, प्रभू; कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही.”


तुमचे भले करावे आणि तुमची संख्या वाढवावी ह्यात जसा परमेश्वराला आनंद होत असे तसाच आनंद तुमचा नाश व निःपात करण्यात त्याला होईल; आणि जी भूमी वतन करून घ्यायला तुम्ही जात आहात तेथून तुमचे उच्चाटन होईल.


जो मार्ग पुन्हा तुमच्या दृष्टीस कधी पडणार नाही असे मी म्हणालो होतो त्याच मार्गाने परमेश्वर तुम्हांला जहाजांनी मिसर देशात परत नेईल; तेथे तुम्ही आपल्या शत्रूंचे दास व दासी होण्यासाठी स्वत:ची विक्री करू पाहाल, पण कोणी तुम्हांला विकत घेणार नाही.


तर आज आकाश व पृथ्वी ह्यांना तुमच्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी सांगतो की, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल.


तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला सांगितलेल्या सर्व हिताच्या गोष्टी सिद्धीस गेल्या त्याप्रमाणेच अहिताचे प्रसंग परमेश्वर तुमच्यावर आणील आणि ही जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला दिली आहे तिच्यामधून तुमचा नायनाट करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan