Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 9:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्यांची सर्व दुष्टता गिल्गालात आहे, तेथेच त्यांच्याविषयी माझ्या ठायी द्वेष उद्भवला; त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे त्यांना मी आपल्या मंदिरातून घालवून देईन; ह्यापुढे मी त्यांच्यावर प्रीती करणार नाही; त्यांचे सर्व सरदार फितुरी आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 कारण त्यांची सर्व अधमता गिल्गालात आहे, तेथेच मला त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. त्यांच्या पापकृत्यामुळे मी माझ्या घरातून त्यांना हाकलणार त्यांच्यावर प्रेम करणार नाही कारण त्यांचे सर्व अधिकारी बंडखोर आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “गिलगालात त्यांची सर्व दुष्कृत्ये आहेत, मी त्यांचा तिथेच द्वेष केला. त्यांच्या पापी कृत्यांमुळे, मी त्यांना माझ्या घरातून हाकलून देईन. मी यापुढे त्यांच्यावर प्रीती करणार नाही; त्यांचे सर्व पुढारी बंडखोर आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 9:15
38 Iomraidhean Croise  

त्याने शिलो येथील निवासमंडप म्हणजे मानवामध्ये उभारलेला आपला डेरा सोडून दिला;


तुझे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत; त्यांतील प्रत्येकाला लाचांची आवड आहे. प्रत्येक जण नजराण्यांमागे लागणारा आहे; ते अनाथाचा न्याय करत नाहीत, विधवेची दाद घेत नाहीत.


माझ्याशी कपटाने वागणार्‍या माझ्या प्रियेचे माझ्या मंदिरात काय काम? नवसांनी व पवित्र मांस अर्पण केल्याने तुझ्यावरचे संकट टळेल काय? टळत असेल तर आनंद कर.


माझे वतन मला वनातल्या सिंहाप्रमाणे झाले आहे; तिने आपला शब्द माझ्याविरुद्ध उच्चारला आहे, म्हणून मी तिचा द्वेष केला आहे.


मग परमेश्वर मला म्हणाला, “मोशे व शमुवेल हे माझ्यापुढे उभे राहिले तरी माझे अंतःकरण ह्या लोकांकडे वळायचे नाही; त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालव, त्यांना निघून जाऊ दे.


आणि तिला जरी असे दिसून आले की मला सोडून जाणारी इस्राएल हिला जारकर्म केल्यामुळे मी टाकून सूटपत्र दिले, तरी तिची बेइमान बहीण यहूदा हिला बिलकूल भीती वाटली नाही; तीही जाऊन व्यभिचार करू लागली.


ह्याकरता मी महाजनांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम ठाऊक आहेत.” पण त्यांनी तर जोखड साफ मोडले आहे व बंधने तोडून टाकली आहेत.


तिच्यातले सरदार भक्ष्य फाडून खाणार्‍या लांडग्यांसारखे आहेत; ते अन्यायाने कमाई करण्यासाठी रक्तपात करतात, मानवी प्राण्यांचा विनाश करतात.


असा तिने आपला व्यभिचार मांडला व आपली काया उघडी केली; तेव्हा जसे तिच्या बहिणीवरून माझे मन उडाले होते तसे तिच्यावरूनही उडाले.


ह्यानंतर ती पुन्हा गर्भवती होऊन तिला कन्या झाली. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “हिचे नाव लो-रुहामा (दया न पावलेली) ठेव; कारण इस्राएल घराण्याला क्षमा करण्याइतकी दया मी त्यांच्यावर पुन्हा करणार नाही.


तेव्हा परमेश्वर म्हणाला, “ह्याचे नाव लो-अम्मी (माझे लोक नव्हत) ठेव; कारण तुम्ही माझे लोक नव्हत व मी तुमचा नव्हे.”


गिलाद मूर्तिपूजक बनला आहे ना? तर तो शून्यवत होऊन जाईल; गिल्गालात त्यांनी बैल अर्पण केले; त्यांच्या वेद्या शेतांच्या तासांतील दगडांच्या राशींसारख्या आहेत.


परमेश्वराचा यहूदाबरोबर वाद आहे, तो याकोबाला त्याच्या आचरणाप्रमाणे शासन करील; त्याच्या कर्माप्रमाणे तो त्याला प्रतिफळ देईल.


कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्राएल लोक हे राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफीम1 ह्यांवाचून बसून राहतील.


हे इस्राएला, तू जरी जारकर्म केले आहेस तरी यहूदाने अशा पापात पडू नये; गिल्गालास येऊ नका, व बेथ-आवेनास जाऊ नका, परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहू नका.”


जसा याजक तसे लोक असे होईल; त्यांच्या आचरणाबद्दल मी त्यांना शासन करीन, त्यांच्या कर्माचे प्रतिफळ त्यांना देईन.


त्यांच्या सर्व दुष्टतेचे स्मरण मला आहे हे ते लक्षात आणत नाहीत; आता त्यांच्याच कर्मांनी त्यांना घेरले आहे; ती माझ्या नजरेसमोर आहेत.


माझा देव त्यांचा त्याग करील, कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही, ते राष्ट्राराष्ट्रांतून भटकणारे असे होतील.


ते परमेश्वराच्या देशात राहायचे नाहीत; एफ्राईम मिसर देशास परत जाईल; ते अश्शूरच्या देशात अमंगल पदार्थ भक्षण करतील.


तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी उद्ध्वस्त करीन, तुमच्या सूर्यमूर्ती1 फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तींच्या मढ्यांवर तुमची मढी फेकून देईन; माझ्या जिवाला तुमची किळस येईल.


“बेथेलास जाऊन पातक करा, गिल्गालास जाऊन पातकाची वृद्धी करा; प्रतिदिवशी सकाळी आपले यज्ञ अर्पा, दर तीन दिवसांनी आपले दशमांश आणा;


आणि मी तुम्हांला दिमिष्काच्या पलीकडे बंदिवान करून नेईन,” असे परमेश्वर म्हणतो; सेनाधीश देव हे त्याचे नाम आहे.


परंतु बेथेलास शरण जाऊ नका, गिल्गालात प्रवेश करू नका. पलीकडे बैर-शेब्यास जाऊ नका; कारण गिल्गाल खातरीने बंदिवासात जाईल, व बेथेल शून्यवत होईल.”


तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, “परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही.”


माझ्या प्रजे, मवाबाचा राजा बालाक ह्याने काय मसलत केली, बौराचा पुत्र बलाम ह्याने त्याला काय उत्तर केले आणि शिट्टीम व गिल्गाल ह्यांच्या दरम्यान काय झाले ह्याचे स्मरण कर, म्हणजे परमेश्वराची न्यायकृत्ये तुला समजतील.” परमेश्वराला काय हवे?


तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाहीत.


मी एका महिन्यात तीन मेंढपाळ कापून टाकले, कारण माझ्या जिवाला त्यांचा कंटाळा आला व त्यांच्या जिवास माझा कंटाळा आला.


कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र ‘सेवक’ येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले;


हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे, प्रमुख याजक व त्याच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले.


मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथे छावणीकडे परतला.


तो वर्षानुवर्ष बेथेल, गिलगाल व मिस्पा ह्या सर्व ठिकाणी फेरी करून इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan