Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 9:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 एफ्राईम आपल्या मुलांना बळी देणार्‍या मनुष्यासारखा2 मला दिसला; तो आपल्या मुलांना वध करणार्‍याकडे घेऊन येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मी एफ्राईमास पाहिले तेव्हा तो मला सोरासारखा, कुरणात लावलेल्या रोपटयासारखा दिसला पण तरी तो आपल्या मुलास बली देणाऱ्या मनुष्यासारखा होऊन जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 सोर जसा सुखदायी ठिकाणी लावलेला मी पाहिला, तसाच एफ्राईम आहे, परंतु एफ्राईम आपल्या मुलांना वध करणार्‍याकडे घेऊन येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 9:13
13 Iomraidhean Croise  

मग मनहेमाने तिरसा येथून निघून तिफसाहात व त्याच्या शिवारात राहणार्‍या लोकांना मार दिला; त्यांनी त्याला आपल्या वेशी उघडल्या नाहीत म्हणून त्याने त्यांना हा मार दिला; त्याने तेथल्या गर्भवती स्त्रिया चिरून काढल्या.


त्याची संतती वाढली तर ती तलवारीला बळी पडायची; त्याच्या संतानास पोटभर भाकर मिळणार नाही.


आणि तुमचे सर्व भाऊबंद, एफ्राइमाचे सर्व संतान ह्यांना घालवून दिले, त्याप्रमाणे मी तुम्हांला माझ्यासमोरून घालवून देईन.


कारण रस्त्यांतली मुले व चौकांतील तरुण नष्ट करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यांतून आत शिरला आहे, त्याने आमच्या वाड्यांत प्रवेश केला आहे.


तू पर्वणीच्या दिवसाप्रमाणे दहशतीच्या बाबी माझ्याकडे चोहोकडून बोलावल्या; परमेश्वराच्या क्रोधदिनी कोणी पळून जाऊन किंवा निभावून राहिला नाही; ज्यांचे मी लालनपालन केले, त्यांचा माझ्या शत्रूने फडशा उडवला आहे.”


तिला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, “अगे सोरे, समुद्राच्या प्रवेशस्थानाजवळ वसलेले, बहुत द्वीपांच्या लोकांसाठी व्यापार चालवणारे; तू म्हणतेस, ‘मी सौंदर्याची खाण आहे.’


तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल; युद्धसमयी शल्मनाने बेथ-आर्बेलास उद्ध्वस्त केले तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले, तशी सर्व तटबंदीची नगरे नाश पावतील.


शोमरोनास प्रायश्‍चित्त मिळेल कारण तो आपल्या देवापासून फितूर झाला आहे; ते तलवारीने पडतील, त्यांची अर्भके आपटून मारतील, त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकतील.


जिची पिले हरण केली आहेत अशा अस्वलीसारखा मी त्यांच्यावर हल्ला करीन, मी त्यांचे ऊर फाडून टाकीन, मी त्यांना तेथे सिंहासारखे खाऊन टाकीन; वनपशू त्यांना फाडून त्यांचे तुकडे-तुकडे करतील.


हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस.


एफ्राइमावर तडाका बसला आहे; त्याचे मूळ सुकून गेले आहे; त्यांना फळ येणार नाही; त्यांना संतती झालीच तर त्यांच्या गर्भाशयाचे ते प्रिय फळ मी मारून टाकीन.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो की, “तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र व तुझ्या कन्या तलवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील, आणि इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने बंदिवान करून नेतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan