Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्यांनी मुले लहानाची मोठी केली, तरी एकही मनुष्य उरणार नाही असे मी त्यांना अपत्यहीन करीन; मी त्यांच्यापासून निघून जाईन तेव्हा त्यांना धिक्कार असो!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जरी त्यांच्या मुलांचे पालन पोषण होऊन ती मोठी झाली तरी मी ते हिरावून घेणार यासाठी की त्यामध्ये कोणी राहू नये. मी त्यांच्यापासून वळून जाईल तेव्हा त्यांच्यावर हाय हाय!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जरी त्यांनी मुलांचे संगोपन केले, तरी मी त्यांना सर्वांपासून दूर करेन. मी त्या लोकांपासून निघून जाईन, तेव्हा त्यांचा धिक्कार असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 9:12
23 Iomraidhean Croise  

त्यामुळे परमेश्वर इस्राएलावर अति कोपायमान झाला; त्याने त्यांना आपल्या दृष्टिआड केले; यहूदाच्या वंशाखेरीज कोणी उरला नाही.


शेवटी परमेश्वराने आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या दृष्टिआड केले. त्यांना स्वदेशातून काढून अश्शूरास नेण्यात आले; तेथेच ते आजवर राहत आहेत.


त्याची संतती वाढली तर ती तलवारीला बळी पडायची; त्याच्या संतानास पोटभर भाकर मिळणार नाही.


मी त्यांना आपल्या देशाच्या वेशींवर सुपाने पाखडून टाकले, त्यांना अपत्यहीन केले; मी त्या लोकांचा विध्वंस केला, कारण ते आपल्या मार्गावरून मागे फिरले नाहीत.


यरुशलेमे, शुद्धीवर ये, नाहीतर तुझ्यावरचा माझा जीव उडेल, मी तुला ओसाड व निर्जन भूमी करीन.”


हे परमेश्वरा, पाहा, हे तू कोणाला केले ह्याचा विचार कर! स्त्रियांनी आपल्या पोटचे फळ, हातावर खेळवलेली आपली बालके खावीत काय? याजक व संदेष्टा ह्यांना प्रभूच्या पवित्रस्थानात जिवे मारावे काय?


तू पर्वणीच्या दिवसाप्रमाणे दहशतीच्या बाबी माझ्याकडे चोहोकडून बोलावल्या; परमेश्वराच्या क्रोधदिनी कोणी पळून जाऊन किंवा निभावून राहिला नाही; ज्यांचे मी लालनपालन केले, त्यांचा माझ्या शत्रूने फडशा उडवला आहे.”


त्यांना धिक्कार असो, कारण ते माझ्यापासून बहकले आहेत; त्यांचा समूळ नाश होणार, कारण त्यांनी माझ्याबरोबर फितुरी केली आहे; त्यांना उद्धरावे अशी माझी इच्छा होती; ते माझ्याविषयी खोटेनाटे बोलले आहेत.


एफ्राईम आपल्या मुलांना बळी देणार्‍या मनुष्यासारखा2 मला दिसला; तो आपल्या मुलांना वध करणार्‍याकडे घेऊन येईल.


एफ्राइमावर तडाका बसला आहे; त्याचे मूळ सुकून गेले आहे; त्यांना फळ येणार नाही; त्यांना संतती झालीच तर त्यांच्या गर्भाशयाचे ते प्रिय फळ मी मारून टाकीन.


जो मनुष्य असे करतो तो हाक मारणारा असो, उत्तर देणारा असो, किंवा सेनाधीश परमेश्वराला यज्ञार्पण करणारा असो, त्याला परमेश्वर याकोबाच्या डेर्‍यातून नाहीसे करील.


देश हेरायला जे चाळीस दिवस लागले त्यांतील प्रत्येक दिवसामागे एक वर्ष ह्या हिशेबाने चाळीस वर्षे तुम्ही आपल्या दुष्कर्माचा भार वाहाल, आणि माझा विरोध तुम्हांला भोवेल.’


कारण परमेश्वराने त्यांच्याविषयी सांगितले होते की ते रानातच मरतील. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा ह्यांच्याशिवाय त्यांच्यातला एकही पुरुष जिवंत राहिला नव्हता.


तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स शापित होतील.


तुझे मुलगे व तुझ्या मुली परक्या राष्ट्रांच्या हाती लागतील, उत्कट इच्छेने आणि त्यांची वाट पाहता पाहता तुझे डोळे शिणतील, आणि तुझ्या हातात काहीच त्राण उरणार नाही.


त्या समयी त्यांच्यावर माझा कोप भडकेल, मी त्यांचा त्याग करीन आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवीन; त्यांचा फडशा उडेल व त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवतील. मग ते म्हणतील, ‘आपला देव आपल्यामध्ये नाही म्हणूनच ह्या विपत्ती आपल्यावर ओढवल्या आहेत ना?’


बाहेर तलवार व घरात दहशत ह्या त्यांचे प्राण हरण करतील, मग तो कुमार असो की कुमारी असो, तान्हे बाळ असो की पिकल्या केसांचा म्हातारा असो.


इकडे बाराकाने हरोशेथ-गोयीमापर्यंत रथांचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तलवारीने पडली; त्यातला एकही वाचला नाही.


इकडे परमेश्वराचा आत्मा शौलाला सोडून गेला आणि परमेश्वराकडून एक दुरात्मा त्याला बाधा करू लागला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan