Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 9:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 एफ्राइमाचे वैभव पक्ष्यांप्रमाणे उडून जात आहे; जन्म, गर्भारपण व गर्भसंभव ही नाहीत, असे झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 एफ्राईमाचे गौरव पक्षाप्रमाणे उडून जाईल तिथे जन्म, गरोदरपणा आणि गर्भधारणा होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 एफ्राईमचे वैभव पक्ष्याप्रमाणे उडून जाईल— जन्म नाही, गर्भधारणा नाही, गर्भसंभव नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 9:11
18 Iomraidhean Croise  

त्याने दुसर्‍याचे नाव एफ्राईम (फलद्रूप) असे ठेवले; “कारण” तो म्हणाला, “माझ्या विपत्तीच्या देशात देवाने मला फलद्रूप केले आहे.”


योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निर्झराजवळ लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डाहळ्या भिंतीवर पसरल्या आहेत.


शौलाची कन्या मीखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही.


तरी दुष्टाचा दीप मालवेल, त्याच्या अग्नीची ज्वाला झळकणार नाही.


सरपटताना विरघळत जाणार्‍या गोगलगाईसारखे, ज्या पतन पावलेल्या गर्भाला सूर्यदर्शन होत नाही त्यासारखे ते होवोत.


कोणा मनुष्याला शंभर मुले झाली व तो बहुत वर्षे जगला, त्याच्या आयुष्याची वर्षसंख्या मोठी असली, तरी त्याचा जीव सुखप्राप्तीने समाधान पावला नाही, त्याचे उत्तरकार्य झाले नाही, तर अशा मनुष्यापेक्षा मृतपिंड पुरवला, असे मी म्हणतो.


एफ्राइमाची तटबंदी, दिमिष्काचे राज्य व अरामाचा अवशेष ही नाहीतशी होतील; इस्राएलाच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


बेथ-आवेनाच्या वासरांसाठी शोमरोनातले रहिवासी घाबरे होतील; तेथले लोक त्याच्याविषयी शोक करतील, त्याचे पुजारी जे त्याच्या वैभवाबद्दल आनंद करीत असत ते आता त्याकरता विलाप करतील, कारण ते त्यांना अंतरले आहे.


जसजशी ह्यांची संख्या वाढत गेली तसतसे ते माझ्याविरुद्ध पाप करीत गेले; मी त्यांचे वैभव पालटून त्याची अप्रतिष्ठा करीन.2


शासनाच्या दिवशी एफ्राईम ओसाड होईल; ही खातरीने होणारी गोष्ट मी इस्राएलाच्या वंशांना कळवली आहे.


हे परमेश्वरा, त्यांना दे; त्यांना काय देशील? गर्भपात करणारे गर्भाशय व शुष्क स्तन त्यांना दे.


परमेश्वर म्हणतो, “अम्मोनवंशजांचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी आपली सीमा वाढवण्यासाठी गिलादाच्या गरोदर स्त्रियांना चिरले.


कारण पाहा, असे दिवस येतील की ज्यांत वांझ, न प्रसवलेली उदरे, व न पाजलेले स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील.


तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स शापित होतील.


आपल्या पोटचा गोळा, आपल्याला झालेली मुले, ह्यांच्याकडे निष्ठुर दृष्टीने पाहील; कारण वेढा पडल्यामुळे व शत्रूने तुला कोंडीत धरल्यामुळे सर्व वस्तूंची तिला वाण पडेल आणि ती गुप्तपणे त्यांना खाईल.


प्रथमजन्मलेल्या गोर्‍ह्यासारखा त्याचा प्रताप आहे; त्याची शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे होत; त्यांनी तो सर्व राष्ट्रांना पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हुंदडील; असे एफ्राइमाचे लाखो व मनश्शेचे हजारो आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan