Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 9:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 रानातल्या द्राक्षांप्रमाणे इस्राएल मला आढळला, अंजिराच्या हंगामातील प्रथमफळासारखे तुमचे पूर्वज मला दिसले; पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीला त्यांनी आपणांस वाहून घेतले; त्यांच्या वल्लभांसारखे ते अमंगळ झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वर म्हणतो, मला इस्राएल जेव्हा आढळला तेव्हा तो रानात द्राक्ष मिळाल्यासारखा होता, अंजीराच्या हंगामातल्या प्रथम फळासारखे तुमचे पुर्वज मला आढळले पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीस त्यांनी आपणास वाहून घेतले ते त्यांच्या मूर्तीसारखे घृणास्पद झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “जेव्हा मला इस्राएल आढळला, तेव्हा ते रानात द्राक्षे आढळल्यासारखे होते; जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना पाहिले, ते अंजिराच्या झाडावर प्रथमफळ पाहण्यासारखे होते. पण जेव्हा ते बआल-पौराला आले तेव्हा त्यांनी त्या घृणास्पद मूर्तींपुढे स्वतःला समर्पित केले आणि त्यांच्या आवडत्या वस्तूप्रमाणे अमंगळ झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 9:10
32 Iomraidhean Croise  

नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या पापकर्मांचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सीदोन्यांचा राजा एथबाल ह्याची कन्या ईजबेल हिच्याशी लग्न केले, आणि तो बआलमूर्तीची सेवा व पूजा करू लागला.


आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्यापुढून घालवली होती त्यांच्याप्रमाणे त्यांनी सगळ्या उच्च स्थानी धूप जाळला आणि परमेश्वराला संताप येईल अशा प्रकारची वाईट कर्मे केली.


त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.


ह्यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले; ते आपल्याच संकल्पाप्रमाणे चालले.


गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय?


हंगामापूर्वी आगसलेला अंजीर कोणाच्या दृष्टीस पडला म्हणजे तो हाती लागताच त्याने चटकन खाऊन टाकावा, त्याप्रमाणे सुपीक खोर्‍याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फूल त्याची गती होईल.


हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे; यरुशलेमेत जितके रस्ते आहेत तितक्या वेद्या, त्या लाजिरवाण्या वस्तूंसाठी म्हणजे अर्थात बआलमूर्तीपुढे धूप जाळण्यासाठी तुम्ही मांडल्या आहेत.


एका टोपलीत पहिल्या बाराच्या अंजिरांसारखे फार चांगले अंजीर होते; दुसर्‍या टोपलीत फार वाईट अंजीर होते, इतके की ते खाण्याजोगे नव्हते.


आमच्या बालपणापासून आमच्या वडिलांचे श्रमफळ म्हणजे त्यांची शेरडेमेंढरे, त्यांची गुरेढोरे, त्यांचे पुत्र व कन्या ह्यांना ह्या लज्जास्पद दैवताने ग्रासून टाकले आहे.


आपण आपल्या लज्जेत लोळू या, आमची अप्रतिष्ठा आम्हांला झाको; कारण आम्ही व आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून आजवर आमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले आहे आणि आमचा देव परमेश्वर ह्याच्या वाणीकडे लक्ष दिले नाही.”


परमेश्वर म्हणतो, “तलवारीपासून निभाव-लेल्या लोकांना रानात अनुग्रह मिळाला; ह्या इस्राएलास विश्रांती देण्यास मला जाणे आहे.


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


तरीपण ते माझ्याशी फितूर झाले व माझे ऐकेनात; त्यांच्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू त्यांच्यातील कोणी फेकून दिल्या नाहीत; मिसर देशाच्या मूर्तीही सोडून दिल्या नाहीत; तेव्हा मिसर देशात त्यांच्यावर माझ्या क्रोधाची वृष्टी करावी, त्यांच्यावर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले.


इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलावले.


मी रानात, रखरखीत प्रदेशात तुला खाऊ घातले.


तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन; आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर1 खिंड देईन; ती आपल्या तारुण्याच्या दिवसांतल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे, माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल.


तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात त्याबद्दल त्यांना मी शासन करणार नाही; कारण ते स्वतः वेश्यांकडे जातात व कसबिणींसह यज्ञ करतात; ह्यास्तव हे ज्ञानशून्य लोक नाश पावत आहेत.


त्यांचा पानोत्सव आटोपल्यावर ते व्यभिचारात मग्न होतात; त्यांच्या सरदारांना3 अप्रतिष्ठा अति प्रिय आहे.


खमीर घातलेल्या भाकरींची अर्पणे ईशोपकारस्मरणासाठी होमरूपे अर्पा. स्वसंतोषाने केलेल्या अर्पणांचा पुकारा करा, ती सर्वांना ऐकवा; इस्राएलवंशजहो, तुम्हांला हे आवडते, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


कोण ही माझी विपत्ती! उन्हाळ्यातील फळे काढून घेतल्यावर जशी झाडावर काही राहतात, द्राक्षीच्या वेलीवर जसा सरवा राहतो, तसा मी झालो आहे; खायला द्राक्षांचा एक घोसही राहिला नाही; माझ्या जिवाला आवडेल असा पहिल्या बाराचा अंजीर राहिला नाही.


ह्या गोंड्यांचा उद्देश असा की, ते तुमच्या नजरेस पडून परमेश्वराच्या सगळ्या आज्ञांचे तुम्हांला स्मरण व्हावे व तुम्ही त्या पाळाव्यात; आपल्या मनास येईल तसे तुम्ही व्यभिचारी मतीने वागत आलात तसे वागू नये;


ते आपल्या देशातील हरतर्‍हेचा प्रथमउपज परमेश्वराप्रीत्यर्थ आणतील तो तुझा होय; तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी तो खावा.


तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे.


तो त्याला वैराण प्रदेशात व घोंघावणार्‍या ओसाड रानात सापडला; त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले.


देव नाहीत अशा भुतांना, जे अलीकडेच नवीन निघाले आहेत, ज्यांना तुमचे पूर्वज भीत नव्हते, अशा अपरिचित देवांना त्यांनी बली अर्पण केले.


बआल-पौराच्या प्रकरणी परमेश्वराने काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे; जे लोक बआल-पौरांच्या नादी लागले त्या सर्वांना तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यामधून नष्ट केले.


म्हणून त्या दिवशी त्याने गिदोनाचे नाव यरुब्बाल (बआलाने बाजू लढवावी) असे ठेवले. तो म्हणाला, “त्याने बआलाची वेदी पाडून टाकली आहे म्हणून बआलाने स्वतः त्याच्याविरुद्ध आपली बाजू लढवावी.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan