Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 इस्राएलास गिळून टाकले आहे, राष्ट्रांमध्ये ते आता टाकाऊ भांड्यासारखे झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 इस्राएलास गिळले आहे, आता ते देशामध्ये बिन कामाची लबाडी करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 इस्राएलास गिळून टाकण्यात आले आहे; राष्ट्रांमध्ये ती कोणासही आवडत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 8:8
19 Iomraidhean Croise  

मग अश्शूराच्या राजाने इस्राएलास पाडाव करून अश्शूर देशात नेले आणि हलह व हाबोर येथे आणि गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांत त्यांना वसवले;


कुंभाराच्या मडक्याचा सपाट्यासरसा चुराडा होतो आणि पडलेल्या तुकड्यात आगटीतून विस्तव घेण्यास किंवा हौदातून पाणी घेण्यास खापरीही सापडत नाही, तसा तो त्याचा चुराडा करील.”


हा कोन्या तुच्छ, फुटक्या पात्रासारखा माणूस आहे काय? तो नापसंत पात्र आहे काय? त्याला व त्याच्या संतानाला माहीत नाही अशा देशात त्यांना का फेकून दिले आहे?


मेंढपाळहो, हायहाय करा, ओरडा; कळपांचे प्रमुखहो, राखेत लोळा; कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत, मोलवान भांडे पडून भंगते तसे तुम्ही पडाल, अशी मी तुमची दाणादाण करीन.


मवाबाच्या सर्व धाब्यांवर, त्याच्या सर्व चव्हाट्यांवर चोहोकडे शोक चालू आहे; कारण नापसंत पात्राप्रमाणे मी मवाबाचा फोडून चुरा केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.


“इस्राएल भटकलेले मेंढरू आहे; सिंहांनी त्याला बुजवले आहे; त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा; शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर.


बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने मला खाऊन टाकले आहे, त्याने मला दळून टाकले आहे, त्याने मला रिकामे पात्र करून ठेवले आहे, त्याने मला अजगराप्रमाणे गिळले आहे. त्याने आपले पोट माझ्या पक्‍वानांनी भरले आहे; त्याने मला बाहेर फेकून दिले आहे.


तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्यावर आपले तोंड पसरले आहे; ते धुत्कारून दात खातात; ते म्हणतात, “आम्ही त्याला गिळून टाकले आहे; खरोखर ह्याच दिवसाची आम्ही अपेक्षा करीत होतो; आम्हांला हा दिवस लाभला, हा आम्ही पाहून चुकलो.”


प्रभूने याकोबाची सर्व वसतिस्थाने गिळून टाकली आहेत, गय केली नाही; त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकले आहेत; त्याने ते धुळीस मिळवले आहेत; त्याने राज्य व त्यातले सरदार ह्यांना भ्रष्ट केले आहे.


प्रभू वैर्‍यासारखा झाला आहे; त्याने इस्राएलास गिळून टाकले आहे; त्याने त्याचे सर्व महाल गिळून टाकले आहेत, त्याने त्याचे दुर्ग मोडून टाकले आहेत; त्याने यहूदाच्या कन्येचे कण्हणे व आक्रंदन बहुगुणित केले आहे.


शुद्ध सुवर्णतुल्य सीयोनेचे प्रिय पुत्र मातीच्या पात्रांच्या, कुंभारांच्या हातच्या कामाच्या योग्यतेचे मानण्यात येतात!


आमचे वतन परक्यांकडे गेले आहे; आमची घरे परदेशीयांच्या हाती गेली आहेत.


म्हणून संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, त्यांनी तुम्हांला उद्ध्वस्त केले आहे, राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेल्या लोकांचा तुमच्यावर ताबा बसावा म्हणून त्यांनी तुम्हांला चोहोकडून ग्रासले आहे, आणि तुमचे नाव लोकांच्या तोंडी झाले आहे व त्यांना तुम्ही निंदेचा विषय झाला आहात.


परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील.


आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले,


तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील; तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील पण त्यांच्यापुढून सात वाटांनी पळून जाशील, आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील.


पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत, सर्व राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करील, आणि तेथे तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना अपरिचित अशा काष्ठपाषाणमय म्हणजे अन्य देवांची सेवा तुम्ही कराल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan