Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कारण ते वार्‍याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात; त्याला ताट नाही, अंकुराला कणीस येत नाही; आलेच तर ते परके खाऊन टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कारण लोक वारा पेरतात आणि वावटळीची कापणी करतात, उभ्या पिकाला कणीस नाही, ते धान्याचे पिठ उत्पन्न करणार नाही, आणि जर त्याची पूर्ण वाढ झाली तरी परके त्यास गिळून टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “ते वारा पेरतात आणि ते वावटळीची कापणी करतात. त्यांच्या पिकांना कणसे येत नाहीत; त्यातून पीठ तयार होत नाही. जर त्यातून अन्न तयार झाले तर परकीय ते गिळून टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 8:7
22 Iomraidhean Croise  

आणि त्यांच्यामागून सुकलेली, खुरटलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली अशी सात कणसे निघाली;


अश्शूरचा राजा पूल ह्याने देशावर स्वारी केली तेव्हा आपणास त्याने मदत करून गादीवर आपली स्थापना स्थिर करावी म्हणून मनहेमाने त्याला एक हजार किक्कार2 चांदी दिली.


इस्राएलाचा राजा पेकह ह्याच्या वेळी अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याने येऊन ईयोन, आबेल-बेथ-माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद व गालील तसेच सबंध नफताली प्रांत घेतला; तेथील लोक त्याने पाडाव करून अश्शूरास नेले.


माझ्या पाहण्यात तर असे आहे की, जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात, ते तशीच कापणी करतात.


जो दुष्कर्म पेरतो तो अनर्थाची कापणी करतो, त्याच्या क्रोधाचा सोटा व्यर्थ होईल.


तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, हेही एक मोठे अनिष्ट आहे; त्याने वायफळ उद्योग केला, त्याचा त्याला काय लाभ?


ती तू लावलीस त्या दिवशी त्यांना तू कुंपण घातलेस व लावलेले बी दुसर्‍या दिवशी सकाळी फुलावे असे केलेस; पण त्याचा हंगाम दुःखाच्या व दुःसह क्लेशाच्या दिवशी केराचा ढीग होईल.


जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो.


कारण पाहा, आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करावा, आपल्या धमकीबरोबर ज्वाला निघाव्यात म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल, त्याचे रथ वावटळीसमान असतील.


त्यांनी गहू पेरला आणि कापणी काटेर्‍याची केली; त्यांनी कष्ट केले पण काही फायदा झाला नाही; परमेश्वराच्या तीव्र कोपामुळे तुमची आपल्या उपजा-संबंधाने फजिती होईल.”


आमचे वतन परक्यांकडे गेले आहे; आमची घरे परदेशीयांच्या हाती गेली आहेत.


म्हणून पिकाच्या वेळी माझे धान्य व हंगामाच्या वेळी माझा द्राक्षारस मी अटकावून ठेवीन व तिची नग्नता झाकण्यासाठी तिला दिलेली माझी लोकर व माझा ताग हिरावून घेईन.


परक्यांनी त्याची शक्ती खाऊन टाकली आहे, पण ते त्याला कळत नाही; त्याचे केस मधूनमधून पिकलेले दिसतात, पण ते त्याला कळत नाही.


एफ्राइमावर तडाका बसला आहे; त्याचे मूळ सुकून गेले आहे; त्यांना फळ येणार नाही; त्यांना संतती झालीच तर त्यांच्या गर्भाशयाचे ते प्रिय फळ मी मारून टाकीन.


परमेश्वर मंदक्रोध व महापराक्रमी आहे; तरी तो पाप्यांना शासन केल्यावाचून राहणार नाही; परमेश्वर वादळात व तुफानात चालतो, मेघ त्याच्या चरणांची धूळ आहेत.


तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते; तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही; तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही; तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हांला ऊब येत नाही; मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो.


फसू नका; देवाचा उपहास व्हायचा नाही; कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल.


जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावा-पासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.


तुझ्या भूमीचे उत्पन्न व तुझ्या सार्‍या श्रमाचे फळ तुला अपरिचित असलेले राष्ट्र खाऊन टाकील आणि तुझा निरंतर छळ होऊन तू रगडला जाशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan