Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 8:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 हे शोमरोना, तुझ्या वासरांचा त्याला वीट आहे; त्यांच्यावर माझा राग पेटला आहे; त्यांना निर्दोषता प्राप्त होण्यास किती काळ लागेल!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 संदेष्टा म्हणतो, हे शोमरोना तुझे वासरू त्याने नाकारले आहे, परमेश्वर म्हणतो, या लोकांविरुध्द माझा राग पेटेल, किती वेळ ते अशुद्ध राहणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 हे शोमरोना, तुझी वासराची मूर्ती फेकून दे! त्यांच्याविरुद्ध माझा राग पेटला आहे. ते अजून किती काळ शुद्ध होण्यास असमर्थ राहतील?

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 8:5
17 Iomraidhean Croise  

आता दाविदवंशजांच्या हाती असलेले परमेश्वराचे जे राज्य त्याच्याशी तुम्ही विरोध करण्याचा विचार मांडला आहे; तुम्ही एकत्र होऊन तुमचा एक मोठा समुदाय झाला आहे आणि यराबामाने जी सोन्याची वासरे तुमचे देव व्हावेत म्हणून बनवली ती तुमच्याजवळ आहेत.


तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर; त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन. आणि महापातकापासून अलिप्त राहीन.


“अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हांला कोठवर आवडणार? निंदा करणारे निंदेत कोठवर आनंद पावणार, आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार?


“राष्ट्रांतून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या; जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात व उद्धार न करणार्‍या दैवतांची प्रार्थना करतात ते ज्ञानशून्य आहेत.


तुझे व्यभिचार, तुझे खिदळणे, तुझ्या जारकर्माचे चाळे, ही तुझी घोर कर्मे मी त्या मैदानातल्या टेकड्यांवर पाहिली आहेत. हे यरुशलेमे, तू हायहाय करणार! तू आपणाला शुद्ध करणार नाहीस काय? असे कोठवर चालणार?”


हे यरुशलेमे, तू आपल्या अंत:करणाची दुष्टता धुऊन टाक, म्हणजे वाचशील. तुझे वाईट विचार तुझ्यामध्ये कोठवर वसणार?


आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्याच्यासंबंधाने इस्राएल फजीत झाला तसा मवाब कमोशासंबंधाने फजीत होईल.


बेथ-आवेनाच्या वासरांसाठी शोमरोनातले रहिवासी घाबरे होतील; तेथले लोक त्याच्याविषयी शोक करतील, त्याचे पुजारी जे त्याच्या वैभवाबद्दल आनंद करीत असत ते आता त्याकरता विलाप करतील, कारण ते त्यांना अंतरले आहे.


इस्राएलाचे पाप म्हणजे आवेनाची उच्च स्थाने नाश पावतील; त्यांच्या वेद्यांवर काटेकुसळे व काटेरी झुडपे उगवतील; ते पर्वतांना म्हणतील, ‘आम्हांला झाकून टाका, टेकड्यांना म्हणतील, आमच्यावर पडा.’


ते आताही अधिकाधिक पाप करीत आहेत, ते आपल्याजवळच्या रुप्याच्या आपणांसाठी ओतीव मूर्ती करीत आहेत; ते आपल्या कल्पनेप्रमाणे मूर्ती करीत आहेत; त्या सर्व कारागिरांच्या कृती आहेत; ते अशा मूर्तींबरोबर बोलतात, यज्ञ करणारी माणसे वासरांचे चुंबन घेतात.


कारण हेही इस्राएलाकडूनच झाले; कारागिराने ते (वासरू) केले, ते देव नाही; ह्या शोमरोनाच्या वासराचे तुकडे-तुकडे होतील.


जे शोमरोन येथील मूर्तीची शपथ घेऊन म्हणतात की, ‘हे दाना, तुझ्या देवाच्या जीविताची शपथ, बैर-शेब्याच्या यात्रेची शपथ,’ ते पडतील; पुन्हा उठायचे नाहीत.”


तिच्या सर्व कोरीव मूर्तींचे फोडून तुकडे करण्यात येतील; तिच्या व्यभिचाराची सर्व कमाई अग्नीने जाळण्यात येईल; तिच्या सर्व मूर्तींची मी नासधूस करीन; वेश्येच्या कमाईने तिने त्या मिळवल्या म्हणून वेश्येची कमाई अशा त्या पुनरपि होतील.


मग त्या दिवसांत ‘त्यांनी वासराची मूर्ती बनवली’ व तिच्यापुढे ‘यज्ञ करून’ आपल्या हातच्या कृतींबद्दल आनंदोत्सव केला.


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan