Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 8:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 जरी ते राष्ट्रात देणग्या देत फिरतात तरी मी आता त्यांना एकत्र करीन, ते राजाधिराजाच्या कारभाराने घटत जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जरी त्यांनी देशात प्रियकर नेमले, तरी मी त्यांना आता एकत्र करीन. राजे आणि पुढारी यांच्या दबावामुळे ते कमी होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जरी त्यांना स्वतःला राष्ट्रांमध्ये विकले असेल, तरीही आता मी त्यांना एकत्र करेन. बलाढ्य राजाच्या अत्याचाराने ते नष्ट होऊ लागतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 8:10
21 Iomraidhean Croise  

इस्राएलास दुःसह क्लेश होत आहेत असे परमेश्वराने पाहिले; बंदिवासात किंवा मोकळा असा कोणीही उरला नव्हता; इस्राएलाचा साहाय्यकारी असा कोणीच राहिला नव्हता.


अश्शूरचा राजा शल्मनेसर हा त्याच्यावर चढाई करून आला; होशे त्याचा अंकित झाला व त्याने त्याला खंडणी दिली.


अश्शूराच्या राजाला होशेची फितुरी दिसून आली; त्याने मिसर देशाचा राजा सो ह्याच्याकडे जासूद पाठवले आणि दरवर्षी जी खंडणी तो अश्शूराच्या राजाला देत असे ती देण्याचे त्याने बंद केले, म्हणून अश्शूराच्या राजाने त्याला पकडून बेड्या घालून कारागृहात ठेवले.


ह्यास्तव इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल आणि त्याच देशाचा राजा तिल्गथ-पिल्नेसर ह्यांना उठवले; त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशाचे लोक ह्यांना पाडाव करून हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत त्यांना नेऊन ठेवले व तेथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत.


तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?


ती फारोचा आश्रय करण्यासाठी व मिसराच्या छायेत लपण्यासाठी माझ्या तोंडचे वचन विचारून न घेता मिसराची वाट धरतात!


मग रब-शाके पुढे होऊन यहूदी भाषेत मोठ्याने म्हणाला, “लोकहो, राजाधिराज अश्शूरचा राजा ह्याचे म्हणणे ऐका.


यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले, “आमची एवढी विनंती मान्य करा; आपणाला दिसत आहे की, आम्ही बहुतांपैकी थोडेच राहिलो आहोत; तर आम्हा सर्व अवशिष्ट लोकांसाठी परमेश्वर आपला देव ह्याच्याकडे प्रार्थना करा की,


लोक वेश्येस वेतन देतात; पण तू उलट आपल्या सर्व जारांना वेतन देतेस, त्यांनी चोहोकडून येऊन तुझ्याबरोबर शिंदळकी करावी म्हणून तू त्यांना लालूच दाखवतेस.


म्हणून पाहा, ज्यांना तू खूश केलेस, प्रेमपात्र व द्वेषपात्र असे जे तुझे सर्व जार, त्यांना मी चोहोंकडून तुझ्याविरुद्ध जमा करीन, त्यांच्यापुढे तुझी लाज उघडी करीन म्हणजे ते तुझी सारी लाज पाहतील.


रुपे, पितळ, लोखंड, शिसे व कथील लोक भट्टीत घालतात व ती वितळण्यासाठी अग्नी फुंकून प्रदीप्त करतात त्याप्रमाणे मी आपल्या क्रोधाने व संतापाने तुम्हांला जमा करीन व भट्टीत घालून वितळवीन.


अहला माझी असतां तिने शिंदळकी केली; ती आपले जार, आपले शेजारी अश्शूरी ह्यांच्यावर आसक्त झाली;


कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी बाबेलचा राजा, राजाधिराज नबुखद्रेस्सर, ह्याला उत्तरेहून घोडे, रथ, स्वार व मोठे दळ ह्यांसह सोरेवर आणीन.


महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल व वैभव ही दिली आहेत;


मला वाटेल तेव्हा मी त्यांना शासन करीन; त्यांना त्यांच्या दोन्ही पातकांस्तव शासन करण्यास त्यांच्याविरुद्ध राष्ट्रे गोळा होतील.


परमेश्वराचा यहूदाबरोबर वाद आहे, तो याकोबाला त्याच्या आचरणाप्रमाणे शासन करील; त्याच्या कर्माप्रमाणे तो त्याला प्रतिफळ देईल.


कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन, ही हलवून सोडीन;


Lean sinn:

Sanasan


Sanasan