Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 7:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 एफ्राईम राष्ट्रांमध्ये मिसळतो; एफ्राईम न उलथलेल्या भाकरीसारखा झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 एफ्राईम त्या लोकांसोबत मिसळतो, एफ्राईम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “एफ्राईम गैर यहूदीयांसोबत मिसळतो; एफ्राईम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 7:8
15 Iomraidhean Croise  

एलीया सर्व लोकांच्या सन्निध येऊन म्हणाला, “तुम्ही दोन्ही मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” लोकांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिले नाही.


ह्या सर्व गोष्टी झाल्यावर सरदार माझ्याकडे येऊन म्हणू लागले, “इस्राएल लोक, याजक व लेवी हे देशोदेशींच्या लोकांपासून निराळे राहत नाहीत; ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी व अमोरी ह्यांच्याप्रमाणेच अमंगळ कृत्ये करतात.


तर तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नयेत; व त्यांच्या कन्या आपल्या पुत्रांना करू नयेत, त्यांचे क्षेमकुशल कधीही चिंतू नये, म्हणजे तुम्ही मजबूत होऊन त्या देशाचे उत्तम फळ चाखाल आणि आपल्यामागे आपल्या वंशजांना तो निरंतरचे वतन ठेवून जाल.’


तर ते त्या राष्ट्रांत मिसळले, आणि त्यांचे आचार शिकले,


एफ्राइमाने आपला रोग पाहिला व यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठवला; पण त्याला तुम्हांला बरे करता येणार नाही, तुमची जखम बरी करता येणार नाही.


ते परमेश्वराबरोबर बेइमान झाले आहेत, कारण त्यांना झालेली मुले परकी आहेत; आता चंद्रदर्शन होताच ते आपल्या वतनभागांसह गडप होतील.


परक्यांनी त्याची शक्ती खाऊन टाकली आहे, पण ते त्याला कळत नाही; त्याचे केस मधूनमधून पिकलेले दिसतात, पण ते त्याला कळत नाही.


ते परमेश्वराच्या देशात राहायचे नाहीत; एफ्राईम मिसर देशास परत जाईल; ते अश्शूरच्या देशात अमंगल पदार्थ भक्षण करतील.


जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीही1 शपथ वाहतात,


यहूदा विश्वासघात करत आहे, इस्राएलमध्ये व यरुशलेमेत एक अमंगळ प्रकार घडला आहे; म्हणजे यहूदाने परमेश्वराला प्रिय असलेले त्याचे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, व परक्या दैवताच्या कन्येबरोबर विवाह केला आहे.


कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्‍यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसर्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan