Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 7:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ते सगळे भट्टीप्रमाणे तप्त असतात; ते आपल्या अधिपतींना गिळून टाकतात; त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत; त्यांच्यातला कोणी माझा धावा करीत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 ते सर्व भट्टी सारखे गरम आहेत, ते आपल्या राज्यकर्त्यांस गिळून टाकतात, त्यांचे सर्व राजे पतन पावले आहे, त्यांच्यातील कोणीही माझा धावा करीत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 ते सर्व भट्टीसारखे तप्त आहेत; ते त्यांच्या अधिपतींना गिळून टाकतात. त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत, त्यातील कोणी मला हाक मारीत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 7:7
27 Iomraidhean Croise  

यहूदाचा राजा आसा ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाशाने नादाबाला ठार मारले, व तो त्याच्या जागी राजा झाला.


नगर हस्तगत झाले असे जिम्रीने पाहिले तेव्हा तो राजवाड्याच्या बुरुजात गेला व त्याने राजवाड्यास आग लावून दिली आणि त्यात तो स्वतःही जळून मेला.


अम्रीच्या पक्षाच्या लोकांनी गीनथपुत्र तिब्नी ह्याच्या पक्षाचा पराभव केला; तिब्नी प्राणास मुकला आणि अम्रीला राजपद मिळाले.


तेव्हा त्याने सांगितले, “ह्यांना जिवंत पकडा.” त्यांनी त्यांना जिवंत पकडले आणि त्या चाळीस पुरुषांना त्या मेंढरे कातरण्याच्या जागेजवळील हौदानजीक जिवे मारण्यात आले; त्याने त्यांच्यातल्या एकालाही जिवंत ठेवले नाही.


ते पत्र त्यांना जाऊन पोहचताच त्यांनी त्या सत्तर राजपुत्रांना पकडून त्यांचा वध केला आणि त्यांची शिरे टोपल्यात घालून त्याच्याकडे इज्रेल येथे पाठवून दिली.


याबेशाचा पुत्र शल्लूम ह्याने त्याच्याशी फितुरी करून व त्याला लोकांदेखत मार देऊन वधले, आणि त्याच्या जागी तो राजा झाला.


मनहेम बिन गादी हा तिरसा येथून शोमरोनास गेला आणि तेथे त्याने शल्लूम बिन याबेश ह्याला मार देऊन वधले आणि त्याच्या जागी तो राजा झाला.


त्याचा सरदार रमाल्याचा पुत्र पेकह ह्याने त्याच्याशी फितुरी करून शोमरोनाच्या राजवाड्याच्या मनोर्‍यात त्याला व त्याच्याबरोबर अर्गोब व अरये ह्यांना वधले; पेकहाबरोबर पन्नास गिलादी लोक होते; त्यांना वधून त्याच्या जागी तो राजा झाला.


उज्जीयाचा3 पुत्र योथाम ह्याच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी होशे बिन एला ह्याने पेकह बिन रमाल्या ह्याच्याशी फितुरी करून त्याला मार देऊन त्याचा वध केला आणि तो त्याच्या गादीवर बसला.


येहूने आकर्ण धनुष्य ओढून योरामाच्या बाहूंच्या दरम्यान असा बाण मारला की तो त्याचा ऊर फोडून गेला आणि तो रथात कलंडून पडला.


त्याने त्यांना सांगितले, “तिला खाली टाका.” त्यांनी तिला खाली टाकले, तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व घोड्यांवर पडले आणि त्याने तिला पायांखाली तुडवले.


जे मनाने अधर्मी असतात ते हृदयात क्रोध बाळगतात; त्याने त्यांना बांधले असता ते धावा करीत नाहीत.


सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, परमेश्वराचे नाव घेत नाहीत.


हे याकोबा, तू तर माझा धावा केला नाहीस; हे इस्राएला, माझा तुला कंटाळा आला.


हे देवा, तुझी आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही.


आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत; आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत; आमच्या अधर्माने आम्हांला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे.


तुझ्या धावा करणारा कोणी नाही; तुझा आश्रय करण्यासाठी कोणी स्वतःला जागृत करीत नाही; कारण तू आपले मुख आमच्यापासून लपवले आहेस; आमच्या अधर्माच्या योगानेच तू आम्हांला भस्म केले आहेस.


तथापि लोक आपले ताडन करणार्‍यांकडे फिरत नाहीत, सेनाधीश परमेश्वराला शरण जात नाहीत.


मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी माझ्यासमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय ह्याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही.


मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे ही सर्व विपत्ती आमच्यावर आली आहे; तरी आपल्या अधर्मापासून परावृत्त व्हावे व तुझ्या सत्याचा उमज पडावा म्हणून आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याची काकळूत केली नाही;


तुझ्या सर्व नगरांतून तुझा बचाव करणारा तुझा राजा कोठे गेला? ज्या तुझ्या शास्त्यांच्या बाबतीत तू म्हणावेस की, “मला राजा व अधिपती असावेत,” ते कोठे गेले?


ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होईपर्यंत मी आपल्या स्थानी जाऊन राहीन; ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील :


इस्राएलाचे जो भूषण तो त्याच्यासमक्ष त्याच्याविरुद्ध साक्ष देतो; इतके असूनही परमेश्वर त्यांचा देव ह्याच्याकडे ते वळले नाहीत, त्याला शरण आले नाहीत.


त्यांनी कधी मनापासून माझा धावा केला नाही; ते आपल्या बिछान्यांवर पडून धान्य व द्राक्षारस ह्यांसाठी ओरडतात; ते जमा होऊन माझ्याविरुद्ध बंड करतात.


त्यांनी राजे नेमले आहेत, पण माझ्या विचाराने नेमले नाहीत; त्यांनी अधिपती स्थापले, पण त्यासाठी माझी संमती नव्हती; केवळ नष्ट होण्याकरताच त्यांनी आपणांसाठी आपल्या सोन्यारुप्याच्या मूर्ती केल्या.


जे अनर्थाचा संकल्प करतात व बिछान्यावर पडल्या-पडल्या दुष्टतेची योजना करतात त्यांना धिक्कार असो! सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan