Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 कारस्थान करीत असताना त्यांनी आपले हृदय भट्टीसारखे केले आहे; त्यांचा कोप रात्रभर निद्रिस्त राहतो; तो सकाळी प्रज्वलित अग्नीसारखा पेट घेतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 भट्टीसारख्या हृदयाने ते कपटी आणि फसव्या योजना करतात. त्यांचा राग रात्रभर अग्नीसारखा धुमसतो, आणि सकाळी धगधगणाऱ्या आग्नीसारखा जळतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 कारस्थाने करताना त्यांची हृदये तापलेल्या भट्टीसारखी होतात. त्यांची उत्कटता रात्रभर धुमसत असते; सकाळी तो प्रज्वलित अग्नीसारखा पेट घेतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 7:6
8 Iomraidhean Croise  

तू प्रकट होशील तेव्हा तू त्यांना जळजळीत भट्टीसारखे पेटवशील; परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यांना ग्राशील, अग्नी त्यांचा संहार करील.


कारण दुष्कर्म केल्यावाचून त्यांना झोप येत नाही; कोणाला पाडले नाही, तर त्यांची झोप उडते.


ते सर्व जारकर्म करणारे आहेत, भटार्‍याने तापवलेल्या भट्टीसारखे ते आहेत, कणीक तिंबवून ती खमिराने फुगेपर्यंतच काय तो विस्तव चाळायचा राहतो.


ते सगळे भट्टीप्रमाणे तप्त असतात; ते आपल्या अधिपतींना गिळून टाकतात; त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत; त्यांच्यातला कोणी माझा धावा करीत नाही.


जे अनर्थाचा संकल्प करतात व बिछान्यावर पडल्या-पडल्या दुष्टतेची योजना करतात त्यांना धिक्कार असो! सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan