Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 7:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मी त्यांना शिक्षण दिले व बाहुबल दिले, तरी ते माझ्याविरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 जरी मी त्यास शिक्षण दिले आणि त्यांना बाहूबल दिले, आता ते माझ्या विरोधात कट रचतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मी त्यांना शिक्षण दिले आहे आणि त्यांचे बाहू बळकट केले आहे, परंतु ते माझ्याविरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 7:15
18 Iomraidhean Croise  

तरी परमेश्वराची त्यांच्यावर कृपा होती; देवाने अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी केलेल्या करारामुळे त्याची इस्राएलावर कृपा होती; त्यांचा त्याला कळवळा होता व त्यांच्यावर त्याची मेहेरनजर होती, म्हणून त्याने त्यांचा अद्यापि नाश केला नाही व आपल्यासमोरून त्यांना दूर केले नाही.


परमेश्वराने इस्राएलास सोडवणारा दिला तेव्हा इस्राएल लोक अरामाच्या ताब्यातून सुटून आपापल्या डेर्‍यांत पूर्वीप्रमाणे राहू लागले.


पाहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य! म्हणून सर्वसमर्थाचे शासन तुच्छ मानू नकोस;


ते आपल्या मनात दुष्कर्मे योजतात; ते सतत लढाई उपस्थित करतात,


राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत?


एकट्या मनुष्याला मारण्यासाठी त्याच्यावर तुम्ही सर्व कोठवर चढाई करून याल? तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे.


हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस तो धन्य;


माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नकोस आणि त्याच्या शासनाला कंटाळू नकोस;


हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?


हे इस्राएला, जो मी तुझा साहाय्यकर्ता त्या माझ्यावर तू उलटलास, त्यामुळे तुझा नाश झाला.


परमेश्वराविषयी तुम्हांला काय वाटते?1 तो पुरापुरा अंत करील; विपत्ती दुसर्‍यांदा येणे नकोच.


आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटलेस, ‘राष्ट्रे का खवळली, व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या?


देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.


तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो;


आणि तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? “माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस;


‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan