Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मनुष्यांवर टपणार्‍या लुटारूंच्या टोळ्यांसारखी याजकांची टोळी आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात; त्यांनी महापाप केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जशी लुटारुंची टोळी टपून बसते, तसा याजकांचा समूह आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात, त्यांनी महापातके केली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 जसे लुटारू बळी पडणाऱ्याची वाट पाहत दबा धरून बसतात, तसेच याजकांच्या टोळ्या शेखेमाच्या वाटेवर वध करतात, ते आपल्या दुष्ट योजना पूर्ण करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 6:9
23 Iomraidhean Croise  

अब्राम त्या देशातून शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते.


यराबाम एफ्राइमाच्या पहाडी प्रदेशात शखेम नगर मजबूत करून तेथे राहू लागला आणि त्यानंतर तेथून निघून जाऊन पनुएल नगराची त्याने मजबुती केली.


पहिल्या महिन्याच्या द्वादशीस अहवा नदीपासून कूच करून आम्ही यरुशलेमेचा मार्ग धरला. आमच्या देवाचा वरदहस्त आमच्यावर असल्यामुळे त्याने शत्रूंपासून व वाटेत घात करण्यास टपून बसणार्‍यांपासून आमचे रक्षण केले.


परमेश्वर मला म्हणाला, “यहूदातील माणसे व यरुशलेमकर ह्यांनी केलेला कट उघडकीस आला आहे.


तिच्यात संदेष्ट्यांनी एकोपा केला आहे; भक्ष्य फाडून खाणार्‍या, गर्जणार्‍या सिंहाप्रमाणे ते लोकांचे प्राण ग्रासून टाकतात; ते धन व पैका हरण करतात; ते तिच्या विधवांची संख्या वाढवतात.


तिच्यातले सरदार भक्ष्य फाडून खाणार्‍या लांडग्यांसारखे आहेत; ते अन्यायाने कमाई करण्यासाठी रक्तपात करतात, मानवी प्राण्यांचा विनाश करतात.


तुझ्यात रक्तपात करण्यासाठी निंदक राहत आहेत, ते तुझ्यातल्या डोंगरावर मेजवानी करतात; तुझ्यात बदफैलीने चालतात.


अशी तुझी शिंदळकीची खोड, मिसर देशात तुला लागलेली व्यभिचाराची चट, मी मोडीन, म्हणजे तू त्यांच्याकडे पुन्हा ढुंकून पाहणार नाहीस व मिसर देशाचे स्मरण तू ह्यापुढे करणार नाहीस.


आता तिच्या वल्लभांसमक्ष तिची लाज उघडी करीन व माझ्या हातून कोणी तिला सोडवणार नाही.


शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे ह्यांना ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत.


याजकांनो, ऐका; हे इस्राएलाच्या घराण्या, लक्ष दे; हे राजघराण्या, कान दे; कारण तुम्हांला शासन होणार; तुम्ही मिस्पा येथे पाश, ताबोरावर पसरलेले जाळे असे झाला आहात.


फितुरी लोक भ्रष्टाचारात बुडून गेले आहेत; तर त्या सर्वांना शासन करणारा मी आहे.


जेव्हा इस्राएलास मी बरे करू पाहतो तेव्हा एफ्राइमाचा अधर्म व शोमरोनाची दुष्टता दिसून येते; ते दगा करतात, चोर घरात शिरतो, बाहेर लुटारूंची टोळी लूट करते.


याकोब घराण्यातील प्रमुखहो, इस्राएल घराण्याचे सरदारहो, जे तुम्ही न्यायाचा अव्हेर करता व नीट आहे त्यास वाकवता ते तुम्ही हे ऐका.


भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे; माणसांत कोणी सरळ उरला नाही; ते सर्व रक्तपात करण्यास टपले आहेत, प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करतो.


तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाहीत.


मग दोन दिवसांनंतर ‘वल्हांडण व बेखमीर भाकरी’चा सण होता आणि त्याला कपटाने कसे धरावे व जिवे मारावे हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते;


ह्यावरून मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करत आहोत? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करतो.


हे ऐकून ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, “हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan