Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 6:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 हे यहूदा, मी आपल्या लोकांचा बंदिवास उलटवीन तेव्हा तुझ्याही हंगामाची वेळ येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तुझ्यासाठी यहूदा, हंगामाची वेळ येईल, तेव्हा मी माझ्या लोकांस बंदिवासापासून मुक्त करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “हे यहूदाह, तुझ्यासाठी हंगामाची वेळ नेमलेली आहे. “जेव्हा मी माझ्या लोकांना जुन्या दिवसात पुनर्स्थापित करेन,

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 6:11
9 Iomraidhean Croise  

ईयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ईयोबाच्या दुःखाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली.


सीयोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले, तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हांला वाटले.


हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.


परमेश्वर म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; कारण पाहा, मी दूर देशातून तुझा उद्धार करीन, बंदिवासाच्या देशातून तुझ्या वंशजांचा उद्धार करीन. याकोब परत येईल, तो विश्राम पावेल व निर्भय होईल; त्याला कोणी धाक घालणार नाही.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, धान्य मळण्याच्या वेळी खळे असते तशी बाबेलकन्या आहे; अजून थोडा अवधी आहे म्हणजे मग तिचा हंगाम येईल.


विळा चालवा, पीक तयार आहे; या, चला, उतरा, द्राक्षांचा घाणा भरला आहे; कुंडे भरून वाहत आहेत; कारण लोकांची दुष्टाई फार आहे.


पण त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, त्याचे संकल्प ते समजत नाहीत; कारण खळ्यासाठी पेंढ्या गोळा करतात तसे त्याने त्यांना गोळा केले आहे.


तो प्रदेश यहूदी घराण्याच्या अवशेषासाठी होईल; तेथे ते आपली मेंढरे चारतील; अष्कलोनाच्या घरातून ते संध्याकाळी बिर्‍हाडास राहतील. कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांना भेट देईल व त्यांचा बंदिवास उलटवील.


तेव्हा आणखी एक देवदूत मंदिरातून निघून, जो मेघावर बसलेला होता त्याला उच्च वाणीने म्हणाला, “तू आपला ‘विळा चालवून’ कापणी कर; कारण ‘कापणीची वेळ आली आहे;’ पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan