Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 इस्राएलाचे जो भूषण तो त्याच्यासमक्ष त्याच्याविरुद्ध साक्ष देतो, म्हणून इस्राएल व एफ्राईम आपल्या पापामुळे अडखळून पडतील, यहूदाही त्यांच्याबरोबर अडखळून पडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 इस्राएलाचा गर्व त्याचाच विरोधात साक्ष देतो, इस्राएल व एफ्राईम आपल्या अपराधात ठेचाळणार, आणि यहूदा सुध्दा त्यांच्या सोबत अडखळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 इस्राएलचा उन्मत्तपणाच त्यांच्याविरुद्ध साक्ष देतो; इस्राएल आणि एफ्राईम सुद्धा आपल्या पापात अडखळतात; यहूदीया देखील त्यांच्यासोबत अडखळतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 5:5
25 Iomraidhean Croise  

दुर्जनाला शिक्षा चुकणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो, पण नीतिमानांच्या वंशजांची मुक्तता होईल.


सात्त्विकाची नीतिमत्ता त्याचा मार्ग नीट करते, पण दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावेल.


विपत्ती आली असता दुर्जन चीत होतो, पण नीतिमानास मरणसमयीही उमेद असते.


कारण नीतिमान सात वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात.


ज्याची दृष्टी कितीतरी उंच, व ज्याच्या पापण्या वर चढलेल्या आहेत असा एक वर्ग आहे.


यरुशलेम कोसळली आहे, यहूदा पतन पावला आहे; कारण त्यांची जिव्हा व त्यांची कृत्ये परमेश्वराविरुद्ध असून ते त्याच्या तेजोमय नेत्रांना तुच्छ लेखतात.


त्यांची मुद्रा त्यांच्याविरुद्ध साक्ष देते; ते सदोमाप्रमाणे आपले पाप जाहीर करतात, लपवत नाहीत; त्यांच्या जीविताला धिक्कार असो; ते स्वतःचे वाईट करून घेतात.


कोरीव मूर्ती घडवणारे सर्व शून्यवत आहेत; त्यांचे रम्य विषय काही कामाचे नाहीत; त्याविषयी साक्ष देणार्‍यांना दृष्टी नाही किंवा अक्कल नाही; म्हणून ती देणार्‍यांना लज्जा प्राप्त होईल.


कारण आमचे अपराध तुझ्यासमोर बहुत आहेत; आमची पातके आमच्याविरुद्ध साक्ष देतात; आमचे अपराध आम्ही जाणून आहोत, आमची दुष्कृत्ये आम्हांला ठाऊक आहेत.


हे परमेश्वरा, आमचे अपराध जरी आमच्याविरुद्ध साक्ष देतात तरी तू आपल्या नामास्तव कार्य कर; आमचे कितीदा पतन झाले आहे! तुझ्याविरुद्ध आम्ही पाप केले आहे.


तुझीच दुष्टता तुला शासन करील, तुझेच पतन तुला शिक्षा करील; तर हे समजून घेऊन ध्यानात आण की परमेश्वर जो तुझा देव त्याला तू सोडले आहेस; आणि तुला माझा धाक वाटत नाही हे अनिष्टकारक व क्लेशदायक आहे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस.


तुम्ही शब्दांनिशी परमेश्वराकडे वळा; त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू.


तू दिवसा ठेच खाशील, रात्री तुझ्यासह संदेष्टाही ठेच खाईल आणि मी तुझ्या आईचा नाश करीन.


कारण मी एफ्राइमास सिंहासारखा व यहूदाच्या घराण्यास तरुण सिंहासारखा होईन; मी फाडून टाकीन आणि परत जाईन, तो मीच; मी त्याला घेऊन जाईन, आणि सोडवणारा कोणी असणार नाही.


इस्राएलाचे जो भूषण तो त्याच्यासमक्ष त्याच्याविरुद्ध साक्ष देतो; इतके असूनही परमेश्वर त्यांचा देव ह्याच्याकडे ते वळले नाहीत, त्याला शरण आले नाहीत.


कारण इस्राएलाने आपल्या उत्पन्नकर्त्यास विसरून मंदिरे बांधली आहेत, यहूदाने तटबंदीची नगरे बहुत बांधली आहेत; पण मी त्याच्या नगरांवर अग्नी पाठवीन, तो त्यांचे वाडे खाऊन टाकील.


“इस्राएल-कुमारी पडली आहे; ती पुन्हा उठायची नाही; तिला आपल्या भूमीवर टाकून दिले आहे; तिला उठवणारा कोणी नाही.”


ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणार्‍यांचे पुत्र आहात, अशी तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता.


तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan