Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 5:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांची कर्मे त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाहीत, कारण अनाचारबुद्धी त्यांच्या ठायी आहे, परमेश्वराला ते ओळखत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्यांचे कृत्य त्यांना माझ्याकडे त्यांच्या देवाकडे परत येऊ देत नाही, कारण त्यामध्ये व्यभिचारी आत्मा राहतो; आणि ते आपला देव परमेश्वर यास ओळखत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “त्यांची कर्मे त्यांना पुन्हा त्यांच्या परमेश्वराकडे येऊ देत नाहीत. वेश्यावृत्तीचा आत्मा त्यांच्या अंतःकरणात आहे; ते याहवेहला ओळखत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 5:4
22 Iomraidhean Croise  

आणि त्यांनी आपल्या पूर्वजांसारखी हट्टी व बंडखोर स्वभावाची पिढी, आपले अंतःकरण नीट न राखणारी व देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी होऊ नये.


ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस.


मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यांना देईन; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन; कारण ते मनापासून माझ्याकडे वळतील.


त्याच्या जलप्रवाहांना झळ लागेल व ते सुकून जातील; कारण तो देश कोरीव मूर्तींचा आहे, त्यातील लोकांना मूर्तींचे वेड लागले आहे.


बाळगायचा असला तर, मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेमदया, न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, ह्याविषयी बाळगावा; ह्यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


कपटाने घेरलेली अशी तुझी वस्ती आहे; कपटामुळे ते मला ओळखण्यास अमान्य आहेत, असे परमेश्वर म्हणतो.


प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदना त्याला लागतील; तो अक्कलशून्य मुलगा आहे, कारण तो गर्भाशयाच्या द्वारानजीक योग्य वेळी येत नाही.


नंतर इस्राएल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर व आपला राजा दावीद ह्यांना शरण येतील; ते शेवटच्या दिवसांत भीतीने कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करतील.” इस्राएलाशी परमेश्वराचा वाद 4 इस्राएल लोकहो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया, व देवज्ञान ही नाहीतशी झाल्यामुळे परमेश्वर ह्या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे.


जारकर्म, द्राक्षारस व नवा द्राक्षारस विवेक नष्ट करतात.


माझे लोक आपल्या लाकडाच्या ठोकळ्याला प्रश्‍न विचारतात; त्यांची काठी त्यांना शकुन सांगते; कारण अनाचारबुद्धीने त्यांना बहकवले आहे, परमेश्वराचा त्याग करणे हा अनाचार त्यांनी केला आहे.


तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात त्याबद्दल त्यांना मी शासन करणार नाही; कारण ते स्वतः वेश्यांकडे जातात व कसबिणींसह यज्ञ करतात; ह्यास्तव हे ज्ञानशून्य लोक नाश पावत आहेत.


ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास म्हणून मीही तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही; तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन.


एफ्राईम एखाद्या खुळ्या निर्बुद्ध पारव्यासारखा आहे; ते मिसराला हाक मारतात; अश्शूराकडे धाव घेतात.


कारण एफ्राइमाने पाप करण्यासाठी पुष्कळ वेद्या केल्या आहेत; ह्या वेद्या पापमूलक झाल्या आहेत.


त्यांनी पित्याला व मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.


तरी तुम्ही त्याला ओळखले नाही; मी त्याला ओळखतो; आणि मी त्याला ओळखत नाही असे जर मी म्हणेन तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन; पण मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो.


एलीचे पुत्र अधम होते; त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan