Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 एफ्राइमाला मी ओळखतो, इस्राएल माझ्यापासून लपलेला नाही; हे एफ्राइमा, तू व्यभिचार केला आहेस; इस्राएल भ्रष्ट झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 एफ्राईम मला माहित आहे आणि इस्राएल माझ्यापासून लपलेला नाही. एफ्राईम तू एका वेश्येसारखा झाला आहेस, इस्राएल अशुद्ध झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 एफ्राईमाबद्दल मला सर्वकाही माहीत आहे; इस्राएल माझ्यापासून लपलेले नाही. हे एफ्राईमा, तू आता वेश्याव्यवसायाकडे वळला आहेस; इस्राएल भ्रष्ट झालेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 5:3
24 Iomraidhean Croise  

कारण वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्या मुलाला समजू लागण्यापूर्वी ज्या दोन राजांच्या भीतीने तू घाबरला आहेस त्यांचा देश उजाड होईल.


एफ्राईम यहूदापासून वेगळा झाला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुला, तुझ्या लोकांना व तुझ्या बापाच्या घराण्याला आणील; म्हणजे अश्शूरच्या राजाला तुझ्यावर आणील.”


अराम, एफ्राईम व रमाल्याचा पुत्र ह्यांनी तुझ्याविरुद्ध दुष्ट संकल्प केला आहे की,


परमेश्वर होशेयाबरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला, “जा, एक जारिणी बायको करून घे व जारकर्माची मुले आपली अशी करून घे; कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करीत आहे.”


एफ्राईम वायूची जोपासना करतो, पूर्वेच्या वार्‍याच्या मागे लागतो; दिवसभर तो लबाडी व नाश ह्यांची वृद्धी करतो; ते अश्शूराबरोबर करार करतात, मिसर देशात तेल नेतात.


एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई; तो इस्राएलाचा सरदार झाला; पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.


मी रानात, रखरखीत प्रदेशात तुला खाऊ घातले.


एफ्राइमाला पीडा झाली आहे, त्याच्या हक्काची पायमल्ली झाली आहे; कारण तो स्वेच्छेने शून्याच्या मागे लागला.


एफ्राइमाने आपला रोग पाहिला व यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठवला; पण त्याला तुम्हांला बरे करता येणार नाही, तुमची जखम बरी करता येणार नाही.


शासनाच्या दिवशी एफ्राईम ओसाड होईल; ही खातरीने होणारी गोष्ट मी इस्राएलाच्या वंशांना कळवली आहे.


इस्राएलाच्या घराण्यात मी घोर प्रकार पाहिला आहे, एफ्राइमात जारकर्म चालू आहे; इस्राएल भ्रष्ट झाला आहे.


हे एफ्राइमा, मी तुला काय करू? हे यहूदा, मी तुला काय करू? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उडून जाणार्‍या दहिवराप्रमाणे आहे.


कारण एफ्राइमाने पाप करण्यासाठी पुष्कळ वेद्या केल्या आहेत; ह्या वेद्या पापमूलक झाल्या आहेत.


“भूतलावरील सर्व कुळांत केवळ तुमच्याबरोबरच मी परिचय केला; म्हणून तुमच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल मी तुमची झडती घेईन.


कारण तुमचे अपराध किती आहेत व तुमची पातके किती घोर आहेत हे मला ठाऊक आहे; तुम्ही नीतिमानाला जाचता, तुम्ही लाच घेता व वेशीत दरिद्र्यांचा न्याय बुडवता.


प्रथमजन्मलेल्या गोर्‍ह्यासारखा त्याचा प्रताप आहे; त्याची शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे होत; त्यांनी तो सर्व राष्ट्रांना पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हुंदडील; असे एफ्राइमाचे लाखो व मनश्शेचे हजारो आहेत.


आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेले आहे.


तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan