Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 फितुरी लोक भ्रष्टाचारात बुडून गेले आहेत; तर त्या सर्वांना शासन करणारा मी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 बंडखोर खोल कत्तलीत राहतात पण मी त्या सर्वांना शिस्त लावेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 बंडखोरांनी भयंकर कत्तल केली आहे, मी त्या सर्वांना शिस्त लावेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 5:2
18 Iomraidhean Croise  

तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता? हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय ग्लान झाले आहे.


जे परमेश्वरापासून आपले मनसुबे लपवतात, आपला कारभार अंधारात चालवतात आणि “आम्हांला कोण पाहतो, आमचे कोणाला कळते,” असे म्हणतात, त्यांना धिक्कार असो;


तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण यिर्मयाविरुद्ध मनसुबा करू. कारण याजकाचे नियमशास्त्रज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेष्ट्यांचे वचन ही नाहीशी होणार नाहीत. चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही.”


हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यांना ताडन करतोस तरी ते दु:खित होत नाहीत; तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत.


ते सर्व फितुर्‍यांतले फितुरी आहेत, ते चोहोकडे चहाड्या करीत फिरतात; ते पितळ व लोखंड आहेत, त्या सर्वांची वर्तणूक बिघडली आहे.


शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे ह्यांना ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत.


म्हणून मी त्यांच्यावर संदेष्ट्याच्या हातून कुर्‍हाड चालवली आहे, माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांना ठार केले आहे; माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे.


मनुष्यांवर टपणार्‍या लुटारूंच्या टोळ्यांसारखी याजकांची टोळी आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात; त्यांनी महापाप केले आहे.


त्यांची सर्व दुष्टता गिल्गालात आहे, तेथेच त्यांच्याविषयी माझ्या ठायी द्वेष उद्भवला; त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे त्यांना मी आपल्या मंदिरातून घालवून देईन; ह्यापुढे मी त्यांच्यावर प्रीती करणार नाही; त्यांचे सर्व सरदार फितुरी आहेत.


‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan