Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 एफ्राइमाने आपला रोग पाहिला व यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठवला; पण त्याला तुम्हांला बरे करता येणार नाही, तुमची जखम बरी करता येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जेव्हा एफ्राईमाने आपला रोग आणि यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला, आणि आपला दूत त्याने महान राजाकडे पाठविला; पण तो त्यास आरोग्य देऊन त्यांची जखम बरी करू शकला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “ज्यावेळी एफ्राईमने त्याचा आजार पाहिला, आणि यहूदाहने त्याची जखम पाहिली, तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे वळला, आणि महान राजाकडे मदतीसाठी विनंती केली. परंतु तो तुला बरे करू शकत नाही, तुझ्या जखमाही बर्‍या करू शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 5:13
16 Iomraidhean Croise  

अश्शूरचा राजा पूल ह्याने देशावर स्वारी केली तेव्हा आपणास त्याने मदत करून गादीवर आपली स्थापना स्थिर करावी म्हणून मनहेमाने त्याला एक हजार किक्कार2 चांदी दिली.


इस्राएलाचा राजा पेकह ह्याच्या वेळी अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याने येऊन ईयोन, आबेल-बेथ-माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद व गालील तसेच सबंध नफताली प्रांत घेतला; तेथील लोक त्याने पाडाव करून अश्शूरास नेले.


मग आहाजाने अश्शूराचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, “मी आपला सेवक, आपला मुलगा आहे, तर आता अरामाचा राजा व इस्राएलाचा राजा हे माझ्यावर चढाई करून आले आहेत. आपण येऊन त्यांच्या हातून माझा बचाव करा.”


त्या दिवशी तो ओरडून म्हणेल, “मी दुरुस्ती करणारा होणार नाही, माझ्या घरी अन्नवस्त्र नाही, मला लोकांचा नायक करू नका.”


कारण परमेश्वर म्हणतो, तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाय भारी आहे.


अहला माझी असतां तिने शिंदळकी केली; ती आपले जार, आपले शेजारी अश्शूरी ह्यांच्यावर आसक्त झाली;


यारेब राजासाठी भेट म्हणून ते अश्शूरास नेतील; एफ्राईम लज्जेने व्याप्त होईल, इस्राएलास आपल्या स्वतःच्या मसलतीची लाज वाटेल;


एफ्राईम वायूची जोपासना करतो, पूर्वेच्या वार्‍याच्या मागे लागतो; दिवसभर तो लबाडी व नाश ह्यांची वृद्धी करतो; ते अश्शूराबरोबर करार करतात, मिसर देशात तेल नेतात.


अश्शूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही, आमच्या हातच्या कृतीस, ‘आमच्या देवा,’ असे ह्यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ्याजवळ पोरक्यांना दया मिळते.


ती आपल्या वल्लभांमागे धावेल, पण ते तिला आटोपणार नाहीत; ती त्यांचा शोध करील, पण ते तिला सापडणार नाहीत; तेव्हा ती म्हणेल, ‘मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण तेव्हाची माझी स्थिती आताच्यापेक्षा बरी होती.’


एफ्राईम एखाद्या खुळ्या निर्बुद्ध पारव्यासारखा आहे; ते मिसराला हाक मारतात; अश्शूराकडे धाव घेतात.


कारण ते अश्शूराकडे वर गेले आहेत; ते स्वच्छंदपणे भटकणार्‍या रानगाढवासारखे आहेत; एफ्राइमाने देणग्या देऊन दोस्ती केली आहे.


कारण तिच्या जखमा असाध्य आहेत; हे अरिष्ट यहूदापर्यंत आले आहे, माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत, यरुशलेमेपर्यंत आले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan