Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 याजकांनो, ऐका; हे इस्राएलाच्या घराण्या, लक्ष दे; हे राजघराण्या, कान दे; कारण तुम्हांला शासन होणार; तुम्ही मिस्पा येथे पाश, ताबोरावर पसरलेले जाळे असे झाला आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 याजकांनो! हे ऐका, इस्राएलाच्या घराण्या लक्ष दे, हे राजघराण्या ऐक, तुम्हा सगळ्यांचा न्याय होणार आहे तुम्ही मिस्पावर पाश आणि ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “तुम्ही याजकांनो, हे ऐका! अहो इस्राएलाच्या घराण्यांनो, लक्ष द्या! राजघराणे, ऐका! हा न्याय तुमच्याविरुद्ध आहे: मिस्पाह येथे तुम्ही पाश झाला आहात, ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 5:1
29 Iomraidhean Croise  

मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजवर मी त्यांना बजावून सांगत आलो आहे; नित्य मोठ्या निकडीने बजावत आलो आहे की माझा शब्द ऐका;


राजाला व राजमातेला सांग, “आसनावरून खाली बसा; कारण तुमच्या वैभवाचा मुकुट तुमच्या शिरावरून खाली पडत आहे.”


राजेश्वर, सेनाधीश परमेश्वर, हे ज्याचे नाम तो म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, डोंगरामध्ये जसा ताबोर व समुद्राजवळ जसा कर्मेल तसा तो निश्‍चये येईल.


तुमच्या दुष्टतेच्या अघोरतेमुळे बेथेल येथे तुम्हांला असे होईल; प्रभातकाळी इस्राएलाचा राजा नाश पावेल.


जिची पिले हरण केली आहेत अशा अस्वलीसारखा मी त्यांच्यावर हल्ला करीन, मी त्यांचे ऊर फाडून टाकीन, मी त्यांना तेथे सिंहासारखे खाऊन टाकीन; वनपशू त्यांना फाडून त्यांचे तुकडे-तुकडे करतील.


नंतर इस्राएल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर व आपला राजा दावीद ह्यांना शरण येतील; ते शेवटच्या दिवसांत भीतीने कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करतील.” इस्राएलाशी परमेश्वराचा वाद 4 इस्राएल लोकहो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया, व देवज्ञान ही नाहीतशी झाल्यामुळे परमेश्वर ह्या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे.


मनुष्यांवर टपणार्‍या लुटारूंच्या टोळ्यांसारखी याजकांची टोळी आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात; त्यांनी महापाप केले आहे.


एफ्राईम माझ्या देवाला हेरणारा आहे; संदेष्टा आपल्या सर्व मार्गांत पारध्याचा फासा आहे; त्याच्या देवाच्या मंदिरात वैरभाव आहे.


अहो वृद्धांनो, हे ऐका; देशातील सर्व रहिवाशांनो कान द्या. तुमच्या काळात अथवा तुमच्या वाडवडिलांच्या काळात अशी गोष्ट कधी घडली होती काय?


इस्राएलवंशजहो, तुमच्याविरुद्ध म्हणजे जे सर्व कूळ मी मिसर देशातून बाहेर आणले त्याच्याविरुद्ध परमेश्वराने सांगितलेले वचन ऐका, ते असे :


इसहाकाची उच्च स्थाने ओसाड होतील, इस्राएलाच्या पवित्र स्थानांची नासधूस होईल, आणि मी तलवार घेऊन यराबामाच्या घराण्यावर उठेन.”


मी म्हणालो, याकोबाच्या प्रमुखांनो, इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका, न्यायाची जाणीव तुम्हांला नसावी काय?


याकोब घराण्यातील प्रमुखहो, इस्राएल घराण्याचे सरदारहो, जे तुम्ही न्यायाचा अव्हेर करता व नीट आहे त्यास वाकवता ते तुम्ही हे ऐका.


भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे; माणसांत कोणी सरळ उरला नाही; ते सर्व रक्तपात करण्यास टपले आहेत, प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करतो.


“मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो; मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नावाचा अपमान करणार्‍या तुम्हा याजकांना परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला?’


आता याजकहो, तुम्हांला ही आज्ञा होत आहे;


इकडे सीसरा ह्याला खबर लागली की, अबीनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे,


तिने अबीनवामाचा मुलगा बाराक ह्याला केदेश-नफताली येथून बोलावून आणले व त्याला विचारले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना?


तो वर्षानुवर्ष बेथेल, गिलगाल व मिस्पा ह्या सर्व ठिकाणी फेरी करून इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.


शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएल लोकांना मिस्पात जमा करा म्हणजे मी तुमच्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करीन.”


तेव्हा ते मिस्पात जमा झाले आणि त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतले व त्या दिवशी उपास करून ते म्हणाले, “आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे.” तेव्हा शमुवेल मिस्पात इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan