Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ते माझ्या लोकांच्या पापावर पोसत आहेत, त्यांच्या अधर्माकडे त्यांचे चित्त लागले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ते माझ्या लोकांच्या पापावर जगतात. त्यांच्या दुष्टतेकडे त्याचे मन लागलेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 माझ्या लोकांच्या पापांवर ते पोषण करतात आणि त्यांच्या दुष्टतेचा आनंद घेतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 4:8
18 Iomraidhean Croise  

दोषार्पणे व पापार्पणे ह्यांचा पैसा येत असे तो मंदिरात जमा करत नसत; तो पैसा याजकांचा असे.


ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, व कपटाने शपथ वाहत नाही तो.


हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो.


ते अधाशी कुत्रे आहेत; त्यांना तृप्ती कशी ती ठाऊक नाही; ते मेंढपाळ ज्ञानशून्य आहेत; चोहोकडून आपला स्वार्थ साधण्यासाठी ते एकंदर आपापल्या मार्गास लागले आहेत.


“मानवपुत्रा, ह्या मनुष्यांनी आपल्या हृदयांत आपल्या मूर्ती वागवल्या आहेत; त्यांनी आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवले आहे; अशा लोकांना मी आपल्याला प्रश्‍न विचारू देईन काय?


इस्राएल घराण्यातला व इस्राएलात वस्ती करून असलेल्या उपर्‍यांतला जो कोणी माझ्यापासून वियुक्त होऊन आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपल्या पापाचे अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवतो व मला प्रश्‍न विचारण्यासाठी संदेष्ट्याकडे येतो, त्याला मी स्वतः मला योग्य वाटेल ते उत्तर देईन;


तुम्ही दुष्टतेच्या पेरणीसाठी नांगरले, अधर्माची कापणी केली, तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले. कारण तू आपल्या मार्गांवर1 भिस्त ठेवली, आपल्या पराक्रमी वीरसमूहावर भाव ठेवला.


एफ्राईम म्हणतो, “मी खरोखर धनवान झालो आहे, मी संपत्ती मिळवली आहे, पापाचा बट्टा लागेल असा अधर्म माझ्या सर्व कमाईत माझ्या हातून झाला नाही.”


हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस.


त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक होईल त्यानेही असेच अर्पण करावे; निरंतरचा विधी म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ त्याचा संपूर्ण होम करावा.


जो याजक पापबली अर्पण करील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी तो खावा.


तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, “परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही.”


तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक अग्नी पेटवू नये म्हणून तुमच्यातला कोणी दरवाजे बंद करील तर बरे! तुमच्यात मला मुळीच संतोष नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; तुमच्या हातचे यज्ञार्पण मी मान्य करून घेणार नाही.


कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.


त्यांचे तोंड बंद केले पाहिजे; जे शिकवू नये ते अनीतीने पैसा मिळवण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्याच्या विश्वासाचा नाश करतात.


ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


माझ्या मंदिरात जी होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण करण्याची मी आज्ञा दिली आहे त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे इस्राएल लोक ह्यांनी केलेल्या अर्पणांपैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस?


Lean sinn:

Sanasan


Sanasan