Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 जसजशी ह्यांची संख्या वाढत गेली तसतसे ते माझ्याविरुद्ध पाप करीत गेले; मी त्यांचे वैभव पालटून त्याची अप्रतिष्ठा करीन.2

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जसे हे याजक वाढत गेले तसे ते माझ्या विरोधात पाप करत गेले. मी त्यांचा सन्मान लाजेमध्ये बदलून टाकीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जितकी याजकांची संख्या वाढत गेली, तितकी अधिक पापे त्यांनी माझ्याविरुद्ध केली; त्यांच्या वैभवशाली परमेश्वराच्या बदल्यात त्यांनी लाजिरवाणी गोष्ट स्वीकारली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 4:7
15 Iomraidhean Croise  

आमच्या पूर्वजांच्या काळापासून आजपर्यंत आम्ही अतिशय अपराधी आहोत; आणि आमच्या अधर्मामुळे आम्ही, आमचे राजे व आमचे याजक अनेक देशांच्या राजांच्या हाती सापडून तलवार, बंदिवास, लुटालूट व लोकलज्जा अशा विपत्तीत पडलो आहोत; आज आमची स्थिती अशीच आहे.


इस्राएल उफाड्याने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे, त्याला भरपूर फळे येतात; जो जो त्याला जास्त फळे आली तो तो त्याने जास्त वेद्या केल्या; त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारले.


यारेब राजासाठी भेट म्हणून ते अश्शूरास नेतील; एफ्राईम लज्जेने व्याप्त होईल, इस्राएलास आपल्या स्वतःच्या मसलतीची लाज वाटेल;


अधोलोकाच्या तावडीतून मी त्यांना उद्धरीन काय? मृत्यूपासून त्यांना मुक्त करीन काय? अरे मृत्यू, तुझ्या महामार्‍या कोठे आहेत? अरे अधोलोका, तुझ्याकडून होणारा विनाश कोठे आहे? माझ्या दृष्टीपासून कळवळा लपला आहे.


जसा त्यांना चारा मिळाला तसे ते चरून तृप्त झाले; ते तृप्त झाले तेव्हा त्यांचे हृदय उन्मत्त झाले आणि ते मला विसरले.


ते खातील पण त्यांची तृप्ती व्हायची नाही; ते व्यभिचार करतील व त्यांची वाढ होणार नाही, कारण त्यांनी परमेश्वराकडे चित्त लावण्याचे सोडून दिले आहे.


याजकांनो, ऐका; हे इस्राएलाच्या घराण्या, लक्ष दे; हे राजघराण्या, कान दे; कारण तुम्हांला शासन होणार; तुम्ही मिस्पा येथे पाश, ताबोरावर पसरलेले जाळे असे झाला आहात.


मनुष्यांवर टपणार्‍या लुटारूंच्या टोळ्यांसारखी याजकांची टोळी आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात; त्यांनी महापाप केले आहे.


एफ्राइमाचे वैभव पक्ष्यांप्रमाणे उडून जात आहे; जन्म, गर्भारपण व गर्भसंभव ही नाहीत, असे झाले आहे.


सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली, तर तूही पी आणि बेसुंत्यांसारखा हो; परमेश्वराच्या उजव्या हातचा प्याला तुझ्याकडे वळेल, तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल.


ह्यास्तव मी तुम्हांला सर्व लोकांपुढे तुच्छ व नीच केले आहे, कारण तुम्ही माझ्या मार्गांनी चालत नाही व माणसांची भीड धरून न्याय करता.”


पण यशुरून (इस्राएल) पुष्ट होऊन लाथा झाडू लागला; तू धष्टपुष्ट झालास, तू लठ्ठ झालास, तू तुकतुकीत झालास; तेव्हा त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाचा त्याग केला, आणि आपल्या तारणदुर्गाला तुच्छ लेखले.


नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.


ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan