Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 4:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात त्याबद्दल त्यांना मी शासन करणार नाही; कारण ते स्वतः वेश्यांकडे जातात व कसबिणींसह यज्ञ करतात; ह्यास्तव हे ज्ञानशून्य लोक नाश पावत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात तेव्हा मी त्यांना शासन करणार नाही कारण पुरुष स्वत: वेश्येकडे वेगळे होऊन जातात, आणि कलावंतिणींबरोबर यज्ञ करतात; हे विवेकहीन लोक आहेत, ते नाश पावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “जेव्हा त्या वेश्याव्यवसायाकडे वळतात, अथवा तुमच्या सुना त्या व्यभिचार करतात, मी तुमच्या कन्यांना शासन करणार नाही, कारण पुरुष स्वतः वेश्यांबरोबर सहवास करतात आणि पवित्र स्थळी असलेल्या देवदासींबरोबर बलिदान करतात— समंजसपणा नसलेल्या लोकांचा नाश होईल!

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 4:14
23 Iomraidhean Croise  

त्याने पुरुषगमन करणार्‍यांना देशातून घालवून दिले आणि त्याच्या वाडवडिलांनी केलेल्या एकंदर मूर्ती टाकून दिल्या.


त्याप्रमाणेच परमेश्वराच्या मंदिराला लागून पुरुषगमन करणार्‍यांची घरे होती ती त्याने मोडून टाकली; त्यांत स्त्रिया अशेरामूर्तींसाठी पडदे विणत असत.


दुर्जनांना न्याय समजत नाही, पण परमेश्वराला शरण जाणार्‍यांना सर्वकाही समजते.


तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता? हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय ग्लान झाले आहे.


त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


ते अधाशी कुत्रे आहेत; त्यांना तृप्ती कशी ती ठाऊक नाही; ते मेंढपाळ ज्ञानशून्य आहेत; चोहोकडून आपला स्वार्थ साधण्यासाठी ते एकंदर आपापल्या मार्गास लागले आहेत.


पुष्कळ लोक आपणांस शुद्ध व शुभ्र करतील; ते स्वच्छ होतील; पण दुर्जन दुर्वर्तन करतील; दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही; पण जे सुज्ञ आहेत त्यांना तो प्राप्त होईल.


जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल; परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत; त्यांनी नीतिमान चालतील आणि पातकी त्यांत अडखळून पडतील.


नंतर इस्राएल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर व आपला राजा दावीद ह्यांना शरण येतील; ते शेवटच्या दिवसांत भीतीने कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करतील.” इस्राएलाशी परमेश्वराचा वाद 4 इस्राएल लोकहो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया, व देवज्ञान ही नाहीतशी झाल्यामुळे परमेश्वर ह्या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे.


एफ्राईम मूर्तीवर आसक्त झाला आहे, त्याचे नाव सोडून द्या.


त्यांची कर्मे त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाहीत, कारण अनाचारबुद्धी त्यांच्या ठायी आहे, परमेश्वराला ते ओळखत नाहीत.


ते गरिबांची मस्तके धुळीत लोळवतात, ते दीनांच्या मार्गात आडवे येतात, माझ्या पवित्र नामास बट्टा लावण्याकरता मुलगा व बाप एकाच तरुणीकडे जातात.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो की, “तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र व तुझ्या कन्या तलवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील, आणि इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने बंदिवान करून नेतील.”


अशा प्रकारे इस्राएल लोक बआल-पौराच्या भजनी लागले, म्हणून परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला;


तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की, तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही.


समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही;


जो कसबिणीशी जडला तो व ती एकशरीर आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? कारण “ती दोघे एकदेह होतील” असे तो म्हणतो.


त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत;


इस्राएलकन्यांपैकी कोणीही वेश्या2 होऊ नये, आणि इस्राएलपुत्रांपैकी कोणालाही पुंमैथुनास वाहू नये.


ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षेवाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासीपुत्र आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan