होशेय 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ते पर्वतांच्या माथ्यांवर यज्ञयाग करतात व टेकड्यांवर ओक, हिवर व एला ह्या झाडांची छाया चांगली असल्यामुळे त्यांच्याखाली धूप जाळतात; म्हणून तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ते पर्वतांच्या शिखरावर बलिदान करतात आणि टेकडयांवर धूप जाळतात, ओक, हिवर, आणि धूप जाळतात, कारण त्यांची सावली चांगली (छान) असते; म्हणून तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 एला वृक्ष, हिवर आणि एला या झाडांखाली, जिथे सुखदायक सावली असते तिथे पर्वतांच्या शिखरांवर यज्ञ करतात आणि टेकड्यांवर ते होमार्पण करतात. म्हणून तुमच्या कन्या वेश्याव्यवसायाकडे वळतात आणि तुमच्या सुना व्यभिचार करतात. Faic an caibideil |
प्रत्येक उंच टेकडीवर, सर्व डोंगरांच्या माथ्यांवर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली, प्रत्येक दाट पालवीच्या एला झाडाखाली ज्या ज्या स्थळी त्यांनी आपल्या सर्व मूर्तींपुढे सुवासिक धूप अर्पण केला, तेथल्या त्यांच्या मूर्तींच्या मध्ये त्यांच्या वेद्यांभोवती त्यांचे वध पावलेले पडतील, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.