Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 4:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 माझे लोक आपल्या लाकडाच्या ठोकळ्याला प्रश्‍न विचारतात; त्यांची काठी त्यांना शकुन सांगते; कारण अनाचारबुद्धीने त्यांना बहकवले आहे, परमेश्वराचा त्याग करणे हा अनाचार त्यांनी केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 माझे लोक त्यांच्या लाकडी मुर्तीचा सल्ला घेतात, त्यांच्या काठ्या त्यांना भविष्य सांगतात. गुंतागुंतीच्या आत्म्याने त्यांना बहकवले आहे, आणि त्यांनी माझा, त्यांच्या परमेश्वराचा त्याग केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 माझे लोक लाकडी मूर्तींचा सल्ला घेतात आणि दैवप्रश्न करणाऱ्यांची काठी त्यांचे भविष्य सांगते. व्यभिचाराचा आत्मा त्यांना भरकटवितो; ते त्यांच्या परमेश्वराला विश्वासू राहिले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 4:12
25 Iomraidhean Croise  

ह्याचे कारण असे की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने त्यांना मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून मिसर देशातून बाहेर आणले होते तरी त्याच्याविरुद्ध त्यांनी पाप केले व अन्य देवांची पूजा केली,


तर इस्राएलाच्या राजाप्रमाणे चाललास आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे यहूदी व यरुशलेमनिवासी ह्यांना व्यभिचारी मतीने चालायला लावले, त्याचप्रमाणे तुझ्याहून चांगले असे जे तुझ्या बापाच्या घराण्यातील तुझे भाऊबंद त्यांचा तू वध केलास;


ते आपल्या कृत्यांनी भ्रष्ट झाले; ते आपल्या कृतींनी अनाचारी बनले.


पाहा, जे तुझ्यापासून दूर जातात ते नष्ट होतात. अनाचार करून बहकून जाणार्‍या सर्वांचा तू समूळ नाश करतोस.


ते एकंदर सर्व पशुवत व मूर्ख आहेत; मूर्तीपासून घ्यावयाचा बोध म्हटला म्हणजे काष्ठरूप!


ते काष्ठास म्हणतात, ‘तू माझा बाप;’ पाषाणास म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास;’ त्यांनी माझ्याकडे मुख नव्हे तर पाठ फिरवली; तरी संकटसमयी ते म्हणतील, ‘ऊठ; आमचा बचाव कर.’


शोमरोनातील संदेष्ट्यांच्या ठायी मी मूर्खपणा पाहिला आहे; त्यांनी बआलदैवतांच्या नावाने भाषणे करून माझे लोक इस्राएल ह्यांना बहकवले आहे.


तुम्ही म्हणता ‘राष्ट्रांप्रमाणे, देशोदेशीच्या लोकांप्रमाणे आम्ही काष्ठपाषाणाची पूजा करू,’ हे जे तुमच्या मनात तरंग उठतात ते सिद्धीस जाणार नाहीत.


कारण बाबेलचा राजा चवाठ्यावर, दोन रस्ते फुटतात तेथे शकुन पाहण्यासाठी थांबला आहे; तो भात्यांतले बाण हलवून प्रश्‍न पाहत आहे, तेराफीमांना1 कौल लावत आहे, यज्ञपशूच्या काळजावरून शकुन पाहत आहे.


अश्शूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही, आमच्या हातच्या कृतीस, ‘आमच्या देवा,’ असे ह्यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ्याजवळ पोरक्यांना दया मिळते.


त्यांची कर्मे त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाहीत, कारण अनाचारबुद्धी त्यांच्या ठायी आहे, परमेश्वराला ते ओळखत नाहीत.


इस्राएलाच्या घराण्यात मी घोर प्रकार पाहिला आहे, एफ्राइमात जारकर्म चालू आहे; इस्राएल भ्रष्ट झाला आहे.


हे इस्राएला, इतर राष्ट्रांप्रमाणे आनंदाने उल्लासू नकोस, कारण तू व्यभिचार करून आपल्या देवाला सोडले आहेस; प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराची कमाई तुला आवडली आहे.


आणि ह्यामुळे व्यभिचारी मतीने अजदैवतांच्या (बोकड) मागे लागून त्यांना त्यांनी आपले यज्ञपशू अर्पण करू नयेत; हा तुम्हांला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


तर मी त्या मनुष्याला व त्याच्या कुटुंबाला विन्मुख होऊन त्याचा व जे कोणी त्याला अनुसरून व्यभिचारी मतीने मोलखाच्या नादी लागतील, त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद करीन.


वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल.


जो काष्ठास म्हणतो, ‘जागे हो’; मुक्या पाषाणास म्हणतो, ‘ऊठ!’ त्याला धिक्कार असो. त्याला काही शिकवता येईल काय? पाहा, ती मूर्ती सोन्यारुप्याने मढवली आहे, पण आत पाहावे तर जिवाचा पत्ता नाही.


ह्या गोंड्यांचा उद्देश असा की, ते तुमच्या नजरेस पडून परमेश्वराच्या सगळ्या आज्ञांचे तुम्हांला स्मरण व्हावे व तुम्ही त्या पाळाव्यात; आपल्या मनास येईल तसे तुम्ही व्यभिचारी मतीने वागत आलात तसे वागू नये;


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, तू लवकरच आपल्या पूर्वजांबरोबर कालनिद्रा घेणार आहेस; मग हे लोक ज्या देशात जाणार आहेत त्यातल्या लोकांमध्ये आल्यावर अन्य देवांच्या मागे व्यभिचारी मतीने लागण्यास प्रवृत्त होतील, व माझा त्याग करून मी त्यांच्याशी केलेला करार मोडतील.


ते त्याला म्हणाले, “ज्या प्रवासाला आम्ही निघालो आहोत तो यशस्वी होईल की नाही हे देवाला विचारून पाहा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan