Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 जारकर्म, द्राक्षारस व नवा द्राक्षारस विवेक नष्ट करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 वेश्यागमन, द्राक्षरस, आणि नवा द्राक्षरस यांनी त्यांचा विवेक काढून घेतला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जुना द्राक्षारस आणि नवीन द्राक्षारस त्यांचा समंजसपणा दूर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 4:11
15 Iomraidhean Croise  

द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे.


हे लमुएला, द्राक्षारस पिणे राजांना शोभत नाही, राजांना ते नाही शोभत; मद्य कुठे आहे असे विचारणे सरदारांना शोभत नाही.


स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कलशून्य आहे. जो आपल्या जिवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करतो.


जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो; लाच खाल्ल्याने बुद्धीला भ्रंश होतो.


हेही द्राक्षारसाने भेलकांडत आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; याजक व संदेष्टा हे मद्याने भेलकंडत आहेत, द्राक्षारसाने गुंग झाले आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; ते दृष्टान्त पाहताना भेलकंडतात, निर्णय सांगताना झोके खातात.


वीणा, सारंगी, डफ, बासरी व द्राक्षारस हीच त्यांची मेजवानी; पण ते परमेश्वराच्या कृतीकडे लक्ष देत नाहीत, ते त्याच्या हातचे कार्य पाहत नाहीत.


शोमरोनातील संदेष्ट्यांच्या ठायी मी मूर्खपणा पाहिला आहे; त्यांनी बआलदैवतांच्या नावाने भाषणे करून माझे लोक इस्राएल ह्यांना बहकवले आहे.


माझे लोक आपल्या लाकडाच्या ठोकळ्याला प्रश्‍न विचारतात; त्यांची काठी त्यांना शकुन सांगते; कारण अनाचारबुद्धीने त्यांना बहकवले आहे, परमेश्वराचा त्याग करणे हा अनाचार त्यांनी केला आहे.


त्यांची कर्मे त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाहीत, कारण अनाचारबुद्धी त्यांच्या ठायी आहे, परमेश्वराला ते ओळखत नाहीत.


एफ्राईम एखाद्या खुळ्या निर्बुद्ध पारव्यासारखा आहे; ते मिसराला हाक मारतात; अश्शूराकडे धाव घेतात.


“जेव्हा जेव्हा तुम्ही, म्हणजे तू व तुझे मुलगे दर्शनमंडपात जाणार असाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस अथवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल; हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय;


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;


मग अबीगईल नाबालाकडे गेली, तेव्हा त्याने आपल्या घरी राजाच्यासारखी मेजवानी केली आहे असे तिने पाहिले; त्याचे चित्त रमून गेले होते. तो फार झिंगला होता; ह्यास्तव सकाळी उजाडेपर्यंत तिने त्याला कमीजास्त काही सांगितले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan