Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ते खातील पण त्यांची तृप्ती व्हायची नाही; ते व्यभिचार करतील व त्यांची वाढ होणार नाही, कारण त्यांनी परमेश्वराकडे चित्त लावण्याचे सोडून दिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ते खातील पण ते त्यास पुरणार नाही; ते व्यभिचार करतील पण त्यांची वाढ होणार नाही, कारण ते आपला देव, परमेश्वर, यापासून खूप दूर गेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “ते खातील परंतु ते तृप्त होणार नाहीत; ते व्यभिचार करतील परंतु त्यांची भरभराट होणार नाही, कारण त्यांनी याहवेहचा त्याग केला आहे आणि स्वतःस वेश्या व्यवसायास सोपविले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 4:10
18 Iomraidhean Croise  

यहोयादा मरण पावल्यानंतर यहूदाच्या सरदारांनी राजाकडे जाऊन त्याला मुजरा केला व राजाने त्यांचे म्हणणे ऐकले.


जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्म्यांबरोबर घालवून देईल. इस्राएलास शांती असो.


त्याच्या तोंडचे शब्द अनीतीचे व कपटाचे असतात; त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत.


नीतिमान पोटभर जेवतो, परंतु दुर्जनांचे पोट रिते राहते.


तुम्ही तर अलीकडे माझ्या दृष्टीने नीट ते करू लागला होता, तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या शेजार्‍याचे स्वातंत्र्य प्रसिद्धपणे ठरवले, व ज्या माझ्या मंदिराला माझे नाम दिले आहे त्यात तुम्ही माझ्यासमक्ष करार केला,


हे समजून घेईल असा शहाणा कोण आहे? परमेश्वराच्या मुखाने त्याला सांगितले असून ते इतरांना कळवील असा कोण आहे? देशाचा नाश का झाला? कोणी त्यातून येत नाही असा तो जळून वैराणासारखा का झाला?


तरीपण नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून दुष्कर्म करू लागला व दुष्टाच्या सर्व अमंगळ आचारांप्रमाणे वागू लागला, तर तो वाचावा काय? त्याने केलेली सर्व नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप ह्यामुळे तो मरेल.


तुझ्यात रक्तपात करण्यासाठी निंदक राहत आहेत, ते तुझ्यातल्या डोंगरावर मेजवानी करतात; तुझ्यात बदफैलीने चालतात.


तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात त्याबद्दल त्यांना मी शासन करणार नाही; कारण ते स्वतः वेश्यांकडे जातात व कसबिणींसह यज्ञ करतात; ह्यास्तव हे ज्ञानशून्य लोक नाश पावत आहेत.


ते सर्व जारकर्म करणारे आहेत, भटार्‍याने तापवलेल्या भट्टीसारखे ते आहेत, कणीक तिंबवून ती खमिराने फुगेपर्यंतच काय तो विस्तव चाळायचा राहतो.


मी तुमच्या भाकरीचा आधार मोडीन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच भट्टीत तुमची भाकर भाजतील आणि ती तुम्हांला तोलून परत देतील; ती खाऊन तुमची तृप्ती व्हायची नाही.


तू खाशील, पण तृप्त होणार नाहीस; तुझ्या ठायी कंगालपणा राहील; तू धनाची सारासार करशील, पण ते तुला वाचवता येणार नाही व तू काही वाचवलेस तर मी ते तलवारीच्या हवाली करीन.


जे परमेश्वरापासून पराङ्मुख झाले आहेत, ज्यांनी परमेश्वराचे चरण धरले नाहीत व त्याचा शोध केला नाही, त्यांना मी नष्ट करीन.”


तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते; तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही; तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही; तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हांला ऊब येत नाही; मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan