Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मग मी पंधरा रुपये व दीड मण जव देऊन तिला आपल्यासाठी विकत घेतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 म्हणून मी पंधरा चांदीचे तुकडे व दिड मण जव देऊन तिला माझ्यासाठी विकत घेतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा मी तिच्या सुटकेसाठी चांदीची पंधरा शेकेल व एक होमेर व एक लेथेक जव देऊन तिला विकत घेतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 3:2
9 Iomraidhean Croise  

गेली वीस वर्षे मी आपल्या घरी काढली; चौदा वर्षे आपल्या दोन्ही मुलींसाठी आणि सहा वर्षे आपल्या शेरडामेंढरांसाठी मी आपली चाकरी केली. आणि दहादा आपण माझ्या वेतनात फेरबदल केला.


वाटेल तो मोबदला व आंदण माझ्यापाशी मागा, तुम्ही मागाल ते मी देईन; तेवढी मुलगी मला बायको करून द्या.”


पण तिचा बाप त्याला ती द्यायला मुळीच राजी नसला, तर कुमारीबद्दल देज देण्याच्या वहिवाटीप्रमाणे त्या पुरुषाने पैसा तोलून द्यावा.


दहा बिघे द्राक्षमळा दहा शेर रस देईल; एक मण बी एक पायली धान्य देईल.”


एफा व बथ ह्या दोन्ही एकाच परिमाणाच्या असाव्यात; बथ होमराचा1 दहावा भाग; तशीच एफाही होमराचा दहावा भाग; ह्या होमराच्या प्रमाणाने असाव्यात.


मी तिला म्हणालो, “तू पुष्कळ दिवस माझ्याकरता स्वस्थ बसून राहा, जारकर्म करू नकोस, परपुरुषाची होऊ नकोस; मीही तुझ्याशी असाच वागेन.”


एखाद्याने आपल्या वतनाच्या शेताचा काही भाग परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र करून वाहिला, तर त्यात बियाणे पडेल त्या मानाने तू त्याचे मोल ठरवावे; एक होमरभर जवाची पेरणी त्यात होत असली तर त्या शेताचे मोल पन्नास शेकेल रुपे ठरवावे.


ह्याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी बायको व्हावी म्हणून मी तिला मोल देऊन घेत आहे; ते ह्यासाठी की मयताचे नाव त्याच्या वतनात कायम राहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदांतून व त्याच्या गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये; ह्याविषयी तुम्ही आज साक्षी आहात.”


तेव्हा शौल म्हणाला, “तुम्ही दाविदाला जाऊन सांगा की, राजाला हुंडा नको; मात्र राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा म्हणून त्याला पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा हव्या आहेत.” शौलाचा ह्यात असा हेतू होता की अशाने तरी दावीद पलिष्ट्यांच्या हातून पतन पावेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan