Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग परमेश्वराने मला म्हटले, “इस्राएल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो. त्याप्रमाणे तू पुन्हा जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिच्यावर प्रेम कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर मला म्हणाला, परत जा, आणि अशा स्त्रीवर प्रेम कर जी दुराचारी असूनही आपल्या पतीस प्रिय आहे. तिच्यावर प्रेम कर जसे मी इस्राएल लोकांवर करतो जरी ते इतर देवतांकडे वळले आणि त्यांना मनुक्याची ढेप प्रिय वाटली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग याहवेह मला म्हणाले, “जा आणि आपल्या पत्नीस आपली प्रीती पुनः प्रकट कर, जरी तिला दुसरा कोणता पुरुष प्रीती करतो आणि ती एक व्यभिचारिणी आहे. जरी ते इतर दैवतांकडे वळले असून पवित्र मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी याहवेह इस्राएली लोकांवर प्रीती करतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 3:1
34 Iomraidhean Croise  

मग त्याने सर्व प्रजेला म्हणजे इस्राएलाच्या समुदायातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकेक भाकर, मांसाचा एकेक तुकडा, खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली. मग सर्व लोक घरोघर गेले.


तरी परमेश्वराची त्यांच्यावर कृपा होती; देवाने अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी केलेल्या करारामुळे त्याची इस्राएलावर कृपा होती; त्यांचा त्याला कळवळा होता व त्यांच्यावर त्याची मेहेरनजर होती, म्हणून त्याने त्यांचा अद्यापि नाश केला नाही व आपल्यासमोरून त्यांना दूर केले नाही.


त्याने इस्राएलाच्या प्रत्येक स्त्रीपुरुषास एकेक भाकर, एकेक मांसाचा तुकडा व खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली.


तरी तू आपल्या दयेच्या बहुत कृत्यांना अनुसरून त्यांचा पुरा अंत केला नाहीस, त्यांचा त्याग केला नाहीस, कारण तू कृपाळू व दयाळू देव आहेस.


पाहा, जसे दासांचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात.


म्हणून दुसर्‍या दिवशी लोकांनी पहाटेस उठून होमार्पणे अर्पण केली, शांत्यर्पणे आणली; ते खायलाप्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले.


मनुकांची पोळी देऊन माझ्या जिवाला आराम द्या; सफरचंद खाऊन मला हुशारी येऊ द्या. मी प्रेमज्वराने पीडित झाले आहे;


पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा, उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे.


इस्राएलाच्या घराण्या, बायको बेइमान होऊन आपल्या पतीस सोडते तसे तुम्ही माझ्याशी बेइमान झाला आहात, असे परमेश्वर म्हणतो.”’


एफ्राईम माझा प्रिय पुत्र आहे ना? तो माझा लाडका मुलगा आहे ना? मी वारंवार त्याच्याविरुद्ध बोलतो तरी मी त्याची आठवण करीतच असतो; म्हणून माझी आतडी त्याच्यासाठी कळवळतात; मी त्याच्यावर दया करीनच करीन, असे परमेश्वर म्हणतो.


हे एफ्राइमा, मी तुला कसा सोडून देईन? हे इस्राएला, मी तुला कसे बहकू देईन? मी तुला अदमासारखे करू काय? सबोइमासारखे करू काय? माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे.


त्यांच्या आईने जारकर्म केले आहे, त्यांचे गर्भधारण करणारीने निर्लज्जपणाचे प्रकार केले आहेत. ती म्हणाली, ‘मला अन्न, पाणी, लोकर, ताग, तेल व पेरे पुरवणार्‍या माझ्या वल्लभांमागे मी लागेन.’


जारकर्म, द्राक्षारस व नवा द्राक्षारस विवेक नष्ट करतात.


आमच्या राजाच्या शुभ दिवशी सरदार द्राक्षारसाने तप्त होऊन बेजार झाले; त्याने आपला हात निंदकांच्या हातात घातला.


गहाण घेतलेली वस्त्रे घालून ते प्रत्येक वेदीजवळ निजतात आणि आपल्या दैवतांच्या1 मंदिरात घेतलेल्या दंडाचा द्राक्षारस प्राशन करतात.


तुम्ही घागरींच्या घागरी द्राक्षारस पिता, उत्तम तेलांनी आपणांस माखता, योसेफावरील आपत्तीबद्दल तुम्ही खेद करत नाही.


मी तर परमेश्वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणार्‍या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, मी करुणायुक्त होऊन पुन्हा यरुशलेमेकडे वळत आहे; त्यात माझे मंदिर बांधतील असे सेनाधीश परमेश्वराचे म्हणणे आहे; यरुशलेमेवर मापनसूत्र लावतील.


येशूने त्याला म्हटले, “गड्या, ज्यासाठी आलास ते कर.” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली.


तुमच्याने प्रभूचा प्याला व भुतांचाही प्याला पिववत नाही; ‘प्रभूच्या मेजावरचे’ व भुतांच्याही मेजावरचे तुमच्याने खाववत नाही.


त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते तसे तुम्ही होऊ नका; कारण “लोक खायलाप्यायला बसले, नंतर नाचतमाशा करायला उठले” असे शास्त्रात लिहिले आहे.


कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यांत चालण्यात जो काळ गेला तितका पुरे.


मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला.


त्यांनी शेतात जाऊन द्राक्षमळ्यातील द्राक्षे खुडून व तुडवून त्यांचा रस काढला आणि उत्सव केला. आपल्या देवाच्या मंदिरात जाऊन मेजवानी केली व अबीमलेखाला शिव्याशाप दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan