Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्यांच्या आईने जारकर्म केले आहे, त्यांचे गर्भधारण करणारीने निर्लज्जपणाचे प्रकार केले आहेत. ती म्हणाली, ‘मला अन्न, पाणी, लोकर, ताग, तेल व पेरे पुरवणार्‍या माझ्या वल्लभांमागे मी लागेन.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्यांची आई वेश्या राहिलेली आहे, व तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे, ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईन, कारण ते मला माझी भाकर आणि पाणी, माझी लोकर आणि ताग, माझे तेल आणि मद्य देतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 कारण त्यांची आई अविश्वासू आहे आणि तिने लाजिरवाणी गोष्ट करून त्यांचे गर्भधारणा केली आहे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकरांच्या मागे जाईन, जे मला माझे अन्न आणि माझे पाणी, माझी लोकर आणि माझे ताग, माझे जैतुनाचे तेल आणि माझे पेय देतात.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 2:5
33 Iomraidhean Croise  

साध्वी नगरी कशी असाध्वी झाली आहे? ती न्यायपूर्ण होती, तिच्यात नीतिमत्ता वसत असे, आता तिच्यात घातकी राहतात.


परमेश्वर म्हणतो, “तुमच्या आईला मी सोडून दिल्याचे सूटपत्र कोठे आहे? ज्याला तुम्हांला विकले तो माझा सावकार कोणता? पाहा, तुमच्या दुष्कर्मामुळे तुमची विक्री झाली आहे; तुमच्या अपराधामुळे तुमच्या आईला सोडावे लागले.


हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे; यरुशलेमेत जितके रस्ते आहेत तितक्या वेद्या, त्या लाजिरवाण्या वस्तूंसाठी म्हणजे अर्थात बआलमूर्तीपुढे धूप जाळण्यासाठी तुम्ही मांडल्या आहेत.


‘हे माझ्यावर का आले?’ असे आपल्या मनात म्हणशील तर तुझ्या मनस्वी दुष्कर्मामुळे तुझ्या अंगावरील वस्त्राचा पदर सारला आहे व तुझ्या टाचा जबरीने उघड्या केल्या आहेत.


कारण प्राचीन काळी तू आपले जू मोडले, आपली बंधने तोडली आणि तू म्हणालीस, ‘मी सेवा करणार नाही.’ आणि तू कसबिणीसारखी प्रत्येक उंच टेकडीवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली ओणवी झालीस.


यरुशलेमे, शुद्धीवर ये, नाहीतर तुझ्यावरचा माझा जीव उडेल, मी तुला ओसाड व निर्जन भूमी करीन.”


ह्याकरता अगे वेश्ये, परमेश्वराचे वचन ऐक :


मी तुला त्यांच्या हाती देईन, म्हणजे ते तुझी कमानदार घरे उद्ध्वस्त करतील, तुझी उच्च स्थाने पाडून टाकतील; तुझी वस्त्रे हिरावून घेऊन व तुझे उंची जवाहीर काढून घेऊन तुला उघडीनागडी करून सोडतील.


तुझ्या जन्माविषयी म्हटले तर तू जन्मलीस तेव्हा तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने धुऊन स्वच्छ केले नाही, तुझ्या अंगाला मीठ चोपडले नाही व तुला बाळंत्यात गुंडाळले नाही.


परमेश्वर होशेयाबरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला, “जा, एक जारिणी बायको करून घे व जारकर्माची मुले आपली अशी करून घे; कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करीत आहे.”


“तुम्ही आपल्या आईची चांगली कानउघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा; कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे; ती आपले शिंदळचाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो;


तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरवणारा व जे सोने, रुपे त्यांनी बआलमूर्तीसाठी वेचले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही.


मग परमेश्वराने मला म्हटले, “इस्राएल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो. त्याप्रमाणे तू पुन्हा जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिच्यावर प्रेम कर.”


तू दिवसा ठेच खाशील, रात्री तुझ्यासह संदेष्टाही ठेच खाईल आणि मी तुझ्या आईचा नाश करीन.


कारण ते अश्शूराकडे वर गेले आहेत; ते स्वच्छंदपणे भटकणार्‍या रानगाढवासारखे आहेत; एफ्राइमाने देणग्या देऊन दोस्ती केली आहे.


रानातल्या द्राक्षांप्रमाणे इस्राएल मला आढळला, अंजिराच्या हंगामातील प्रथमफळासारखे तुमचे पूर्वज मला दिसले; पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीला त्यांनी आपणांस वाहून घेतले; त्यांच्या वल्लभांसारखे ते अमंगळ झाले.


त्या समयी सुंदर तरुणी व तरुण तहानेने मूर्च्छित होतील.


नंतर पलिष्ट्यांचे सरदार आपल्या दागोन नामक देवाप्रीत्यर्थ महायज्ञ अर्पून उत्सव करण्यासाठी जमले; ते म्हणू लागले, “आपल्या देवाने आपला शत्रू शमशोन ह्याला आपल्या हाती दिले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan