Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ज्या आपल्या द्राक्षालतांविषयी व अंजिराच्या झाडांविषयी ती म्हणत असे की, ‘ही माझ्या वल्लभांनी दिलेली माझी वेतने आहेत.’ ती मी उद्ध्वस्त करीन; मी त्यांचे रान बनवीन, आणि ती वनपशू खाऊन टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मी तिच्या द्राक्षवेली आणि अंजिराची झाडे नष्ट करीन, ज्या विषयी ती म्हणाली होती, माझ्या प्रियकरांनी दिलेली ही माझी वेतने आहेत. मी त्याचे रान करीन आणि वन्य पशू येऊन ते फस्त करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मी तिच्या द्राक्षमळ्यांचा व अंजिराच्या झाडांचा नाश करेन, जो तिच्या प्रियकरांनी तिला वेतन म्हणून दिला होता, असे तिचे म्हणणे आहे; मी त्यांचे गर्द झाडी करेन व वनपशू ते खाऊन टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 2:12
14 Iomraidhean Croise  

त्याची कुंपणे तू का मोडलीस? त्यामुळे वाटेने येणारेजाणारे सगळे त्याची द्राक्षे तोडतात.


लबानोनाची बाग होण्यास, बागेचे वन गणले जाण्यास थोडासा अवधी आहे, नाही काय?


आता मी आपल्या द्राक्षीच्या मळ्याचे काय करणार ते तुम्हांला सांगतो : मी त्याचे कुंपण काढून टाकीन म्हणजे तो खाऊन टाकतील; त्याचे आवार मोडीन म्हणजे तो तुडवला जाईल.


त्या दिवशी असे होईल की जेथे जेथे हजार रुपये किमतीचे हजार द्राक्षींचे वेल असत तेथे तेथे काटेकुटे होतील.


म्हणून मी तुझे नेसण तुझ्या तोंडावर उडवीन म्हणजे तुझी लज्जा दिसेल.


“यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या दिवसांत मीखा1 मोरष्टकर ह्याने संदेश दिला; तो यहूदाच्या सर्व लोकांना म्हणाला, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम ढिगार होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.’


ते तुझे पीक, तुझ्या मुलाबाळांचे अन्न खाऊन टाकतील; ते तुझी शेरडेमेंढरे, तुझी गुरेढोरे, खाऊन टाकतील; तुझ्या द्राक्षलता व अंजिरांची झाडे फस्त करतील; ज्या तटबंदीच्या नगरांवर तुझी भिस्त आहे त्यांना ते तलवारीने उद्ध्वस्त करतील.”


परमेश्वर म्हणतो, मी त्यांचा अगदी नायनाट करीन; द्राक्षलतेवर द्राक्षे, अंजिराच्या झाडावर अंजीर नसतील; पानेही वाळून जातील; म्हणून जे काही मी त्यांना दिले आहे ते त्यांच्यापासून निघून जाईल.”


जिची पिले हरण केली आहेत अशा अस्वलीसारखा मी त्यांच्यावर हल्ला करीन, मी त्यांचे ऊर फाडून टाकीन, मी त्यांना तेथे सिंहासारखे खाऊन टाकीन; वनपशू त्यांना फाडून त्यांचे तुकडे-तुकडे करतील.


त्यांच्या आईने जारकर्म केले आहे, त्यांचे गर्भधारण करणारीने निर्लज्जपणाचे प्रकार केले आहेत. ती म्हणाली, ‘मला अन्न, पाणी, लोकर, ताग, तेल व पेरे पुरवणार्‍या माझ्या वल्लभांमागे मी लागेन.’


कारण मी एफ्राइमास सिंहासारखा व यहूदाच्या घराण्यास तरुण सिंहासारखा होईन; मी फाडून टाकीन आणि परत जाईन, तो मीच; मी त्याला घेऊन जाईन, आणि सोडवणारा कोणी असणार नाही.


हे इस्राएला, इतर राष्ट्रांप्रमाणे आनंदाने उल्लासू नकोस, कारण तू व्यभिचार करून आपल्या देवाला सोडले आहेस; प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराची कमाई तुला आवडली आहे.


म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan