Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आता तिच्या वल्लभांसमक्ष तिची लाज उघडी करीन व माझ्या हातून कोणी तिला सोडवणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 नंतर मी तिच्या प्रियकरांसमोर तिला नग्न करीन व त्यापैकी कोणीही तिला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 म्हणून मी आता तिची अश्लीलता तिच्या प्रियकरांसमोर उघडी करेन; माझ्या हातून तिला कोणीही वाचवू शकणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 2:10
19 Iomraidhean Croise  

त्या दुष्ट अथल्येच्या पुत्रांनी देवाचे मंदिर मोडूनतोडून टाकले होते आणि परमेश्वराच्या मंदिरातील सगळ्या समर्पित वस्तू त्यांनी बआलदैवतांना वाहिल्या होत्या.


अहो देवाला विसरणार्‍यांनो, ह्याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हांला फाडून टाकीन, तेव्हा तुम्हांला कोणी सोडवणारा सापडणार नाही.


दुर्जनाला शिक्षा चुकणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो, पण नीतिमानांच्या वंशजांची मुक्तता होईल.


म्हणून प्रभू सीयोनेच्या कन्यांच्या माथ्यांवर खवडे उठवील व परमेश्वर त्यांची गुह्यांगे उघडी करील.


‘हे माझ्यावर का आले?’ असे आपल्या मनात म्हणशील तर तुझ्या मनस्वी दुष्कर्मामुळे तुझ्या अंगावरील वस्त्राचा पदर सारला आहे व तुझ्या टाचा जबरीने उघड्या केल्या आहेत.


म्हणून मी तुझे नेसण तुझ्या तोंडावर उडवीन म्हणजे तुझी लज्जा दिसेल.


तू आपली वस्त्रे घेऊन रंगीबेरंगी उच्च स्थाने आपणांसाठी सजवलीस आणि कधी झाली नाही व पुन्हा कधी व्हायची नाही अशी शिंदळकी त्यांवर केलीस.


मी भाकर, सपीठ, तेल व मध तुला देत असे व तुला भरवत असे, तीही तू त्यांच्यापुढे सुगंधी अर्पण ठेवलेस म्हणून हे असे घडत असे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


ते द्वेषाने तुझा समाचार घेतील, ते तुझी सर्व मालमत्ता हरण करून तुला नागवीउघडी करतील; अशाने तुझ्या शिंदळचाळ्यांची, तुझ्या कामासक्तीची व तुझ्या व्यभिचाराची लाज उघडी पडेल.


इस्राएल उफाड्याने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे, त्याला भरपूर फळे येतात; जो जो त्याला जास्त फळे आली तो तो त्याने जास्त वेद्या केल्या; त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारले.


एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई; तो इस्राएलाचा सरदार झाला; पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.


नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्माच्या दिवशी होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन.


मनुष्यांवर टपणार्‍या लुटारूंच्या टोळ्यांसारखी याजकांची टोळी आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात; त्यांनी महापाप केले आहे.


वनपशूंत सिंह, मेंढरांत तरुण सिंह गेला असता तो त्यांना तुडवून फाडतो, कोणाच्याने त्यांचे रक्षण करवत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक राष्ट्रांत, बहुत लोकांत होतील.


म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan