Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 14:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्याला लबानोनासारखा सुवास सुटेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याच्या फांद्या पसरतील, त्याची सुंदरता जैतून वृक्षासारखी होईल, आणि त्याचा सुगंध लबानोनातील देवदार वृक्षासारखा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्याच्या फांद्या पसरतील. त्याचे वैभव एका जैतून वृक्षासारखे होईल. त्याचा सुगंध लबानोनातील गंधसरू सारखा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 14:6
19 Iomraidhean Croise  

त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले; तेव्हा त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेऊन आशीर्वाद दिला तो असा : पाहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे;


तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल; तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील.


मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; देवाच्या दयेवर सदासर्वकाळ माझा भरवसा आहे.


नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.


येणार्‍या दिवसांत याकोब मूळ धरील; इस्राएल फुलेल व त्याला फळे येतील; ते फळांनी भूपृष्ठ भरतील.


ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन ह्यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील.


ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील; परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायी प्रकट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूंवर होईल.


परमेश्वराने तुला ‘चांगल्या फळांनी शोभिवंत असलेले हिरवे जैतून झाड’ हे नाव दिले, पण मोठी गर्जना करून त्याने त्याला आग लावली व त्याच्या फांद्या मोडल्या.


चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू; त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्‍चित आहे; तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणार्‍या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल.”


त्याने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणाएका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला;


मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे.


मला सर्वकाही आहे व ते विपुल आहे; एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक1 यज्ञ, असे आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan