Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 13:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 शोमरोनास प्रायश्‍चित्त मिळेल कारण तो आपल्या देवापासून फितूर झाला आहे; ते तलवारीने पडतील, त्यांची अर्भके आपटून मारतील, त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 शोमरोनात दोष येईल, कारण त्याने देवाविरुध्द बंड केले आहे ते तलवारीने पडतील. त्यांची लहान मुले आपटली जातील आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरुन टाकण्यात येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 शोमरोनच्या लोकांनी त्यांचा दोष वाहिलाच पाहिजे, कारण त्यांनी त्यांच्या परमेश्वराविरुद्ध बंड केले. ते तलवारीने पडतील; त्यांची बालके जमिनीवर आपटली जातील, आणि त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकण्यात येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 13:16
23 Iomraidhean Croise  

मग मनहेमाने तिरसा येथून निघून तिफसाहात व त्याच्या शिवारात राहणार्‍या लोकांना मार दिला; त्यांनी त्याला आपल्या वेशी उघडल्या नाहीत म्हणून त्याने त्यांना हा मार दिला; त्याने तेथल्या गर्भवती स्त्रिया चिरून काढल्या.


त्यामुळे परमेश्वर इस्राएलावर अति कोपायमान झाला; त्याने त्यांना आपल्या दृष्टिआड केले; यहूदाच्या वंशाखेरीज कोणी उरला नाही.


मग अश्शूराच्या राजाने सर्व देशावर स्वारी केली आणि शोमरोनास जाऊन तो तीन वर्षे वेढा घालून राहिला.


होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूराच्या राजाने शोमरोन सर केले व इस्राएल लोकांना अश्शूर देशात नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांतून वसवले.


हजाएलाने विचारले, “माझे स्वामी का रडत आहेत?” त्याने म्हटले, “तू इस्राएल लोकांना उपद्रव देणार; त्यांची तटबंदी नगरे जाळून टाकणार, त्यांचे तरुण पुरुष तलवारीने वधणार; त्यांची मुलेबाळे तू आपटून मारणार; त्यांच्या गर्भवती स्त्रिया तू चिरून टाकणार; हे सर्व मला ठाऊक आहे म्हणून.”


त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची तान्ही बाळे ते आपटून मारतील; त्यांची घरे लुटतील; त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट करतील.


एफ्राइमाची तटबंदी, दिमिष्काचे राज्य व अरामाचा अवशेष ही नाहीतशी होतील; इस्राएलाच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


कारण ह्या मुलाला आई, बाबा, म्हणता येण्यापूर्वीच अश्शूरच्या राजापुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट म्हणून घेऊन जातील.”


त्यांचे हृदय बेइमान आहे, आता त्यांना प्रायश्‍चित्त मिळालेच पाहिजे; तो त्यांच्या वेद्या मोडून टाकील; तो त्यांचे मूर्तिस्तंभ उद्ध्वस्त करील.


त्यांच्या मसलतीमुळे तलवार त्यांच्या नगरांवर फिरेल. ती त्यांचे अडसर मोडून-तोडून खाऊन टाकील.


त्यांनी कधी मनापासून माझा धावा केला नाही; ते आपल्या बिछान्यांवर पडून धान्य व द्राक्षारस ह्यांसाठी ओरडतात; ते जमा होऊन माझ्याविरुद्ध बंड करतात.


परमेश्वर म्हणतो, “अम्मोनवंशजांचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी आपली सीमा वाढवण्यासाठी गिलादाच्या गरोदर स्त्रियांना चिरले.


अश्दोदातील महालातून व मिसर देशातील महालातून असे जाहीर करून सांगा : “शोमरोनाच्या डोंगरावर जमा व्हा; त्यामध्ये केवढी दंगल चालली आहे ती पाहा, त्यांच्यात काय जुलूम होत आहे तो पाहा.”


मी प्रभूला वेदीजवळ उभे राहिलेले पाहिले; तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यांवर प्रहार कर म्हणजे उंबरठे हलतील; त्यांचे तुकडे करून त्या सर्वांच्या डोक्यावर पाड; त्यांच्यातले शेष उरतील ते मी तलवारीने वधीन; त्यांतला कोणी पळून जाऊ पाहील, पण त्याला पळून जाता येणार नाही; त्यांतला कोणी निसटून जाऊ पाहील, पण तो निभावणार नाही.


अग्नीपुढे मेण वितळते अथवा उतरणीवर ओतलेले पाणी वाहते, तसे पर्वत त्याच्या खाली विरघळतात व खोरी फाटतात.


अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”


तरी ती हद्दपार झाली, तिला बंदिवान करून नेण्यात आले; तिची मुले रस्त्यांच्या सर्व चवाठ्यांवर आपटून मारण्यात आली; तिच्या सरदारांवर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, तिच्या सर्व महाजनांना साखळ्यांनी बांधण्यात आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan