Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 13:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तो जरी आपल्या भाऊबंदांत फलद्रूप आहे तरी पूर्वेचा वारा, रानातून परमेश्वराचा वारा येईल आणि त्याची विहीर आटेल, त्याचा झरा सुकून जाईल; तो त्याच्या निधींतील सर्व मनोरम वस्तू हरण करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 एफ्राईम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला, तरी पूर्वेचा वारा येईल, परमेश्वराचा वारा रानातून येईल एफ्राईमाचा झरा सुकून जाईल, त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही. त्यांचा शत्रू त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जरी तो त्याच्या भावांमध्ये अत्यंत फलद्रूप होता, परंतु याहवेहकडून पूर्वेकडील वारा येईल, तो वाळवंटातून येईल; त्याचे झरे सुकून जातील आणि त्याची विहीर कोरडी पडेल. त्याच्या भांडारातील सर्व खजिना लुटला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 13:15
27 Iomraidhean Croise  

आणि त्यांच्यामागून सुकलेली, खुरटलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली अशी सात कणसे निघाली;


त्याने दुसर्‍याचे नाव एफ्राईम (फलद्रूप) असे ठेवले; “कारण” तो म्हणाला, “माझ्या विपत्तीच्या देशात देवाने मला फलद्रूप केले आहे.”


आणि पाहा, त्यांच्यामागून खुरटलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली अशी सात कणसे निघाली.


त्याचे म्हणणे नाकारून त्याचा बाप म्हणाला, “मुला, ठाऊक आहे, मला हे ठाऊक आहे; त्याचेही एक राष्ट्र होईल आणि तोही महान होईल. तथापि त्याचा धाकटा भाऊ त्याच्यापेक्षा मोठा होईल आणि त्याच्या वंशजांतून राष्ट्रांचा समुदाय निर्माण होईल.


योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निर्झराजवळ लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डाहळ्या भिंतीवर पसरल्या आहेत.


खालून त्याचे मूळ सुकेल, व वरून त्याची डाहळी छाटतील.


दुर्जन तसे नाहीत, ते वार्‍याने उडून जाणार्‍या भुसासारखे आहेत.


त्याच्या वंशाचा उच्छेद होवो; भावी पिढीत त्याचा नामनिर्देश न होवो.


वडिलांच्या दुष्कर्मास्तव त्याच्या पुत्रांसाठी वधस्थान सिद्ध करा, म्हणजे ते उदयास येऊन देश जिंकणार नाहीत, पृथ्वीचा भाग नगरांनी व्यापून टाकणार नाहीत.”


राष्ट्रे महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात; परंतु तो त्या खळबळीस प्रतिरोध करील व ती नाहीशी होईल; डोंगरांवरचे भूस व वावटळीतील धूळ ही वार्‍यापुढे उडून जातात तशी ती नष्ट होईल.


तू तिचा त्याग केला तेव्हा तिला तू बेताचे शासन केलेस; पूर्वेकडील वारा वाहत असता त्याने तिला प्रचंड वार्‍याने उडवून दिले.


तू त्यांना उफणशील, वारा त्यांना उडवून टाकील, वावटळ त्यांना उधळून देईल; आणि तू परमेश्वराच्या ठायी उल्लास पावशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील.


नगरातले सर्व निधी, त्यातली सर्व कमाई, त्यातल्या सर्व मोलवान वस्तू व यहूदाच्या राजांची सर्व भांडारे मी त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन, आणि ते ती लुटून बाबेलास घेऊन जातील.


त्या काळी ह्या लोकांना व यरुशलेमेस म्हणतील, “रानातील उजाड टेकड्यांवरून उष्ण वारा माझ्या लोकांच्या कन्येवर येत आहे, तो काही विंझणवारा म्हणून किंवा स्वच्छ करण्यासाठी येत नाही.


ह्या कामास लागतो त्याहून जोराचा वारा माझ्या कार्यासाठी येईल; मी आता त्यांच्या शिक्षाही सांगतो.”


परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी बाबेलवर व लेब-कामाईच्या1 रहिवाशांवर एका विध्वंसकाच्या मनास प्रवृत्त करीत आहे.


ह्यामुळे परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, मी तुझ्या पक्षाने लढेन, तुझ्याकरता सूड उगवीन; मी त्याचा सागर आटवीन, त्याचा झरा सुकवीन.


पाहा, तिची लागवड झाली तरी ती जीव धरील काय? पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती सुकणार नाही काय? ती ज्या वाफ्यात वाढली त्यातच ती मरून जाईल.”


तेव्हा तिच्यावर क्रोध होऊन तिला उपटून जमिनीवर पाडण्यात आले; पूर्वेकडील वार्‍यामुळे तिची फळे करपली; तिचे मजबूत धुमारे मोडून वाळून गेले; अग्नीने खाक केले.


तो त्यांची दैवते, ओतीव मूर्ती, आणि त्यांची सोन्यारुप्याची सुंदर भांडी लुटून मिसर देशात नेईल; तो उत्तरेच्या राजावर चढाई न करता काही वर्षे राहील.


इस्राएल उफाड्याने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे, त्याला भरपूर फळे येतात; जो जो त्याला जास्त फळे आली तो तो त्याने जास्त वेद्या केल्या; त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारले.


नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्माच्या दिवशी होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन.


वार्‍याने त्यांना आपल्या पंखांत लपेटून टाकले आहे; ते आपल्या यज्ञयागास्तव लज्जित होतील.


एफ्राइमाचे वैभव पक्ष्यांप्रमाणे उडून जात आहे; जन्म, गर्भारपण व गर्भसंभव ही नाहीत, असे झाले आहे.


मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळईचा वारा वाहवला, तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले; त्याने तो मूर्च्छित झाला व आपणाला मृत्यू येवो, अशी विनवणी करून तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते!”


चांदी लुटा! सोने लुटा! सर्व तर्‍हेच्या शोभिवंत वस्तूंचा अमर्याद संग्रह आहे.


प्रथमजन्मलेल्या गोर्‍ह्यासारखा त्याचा प्रताप आहे; त्याची शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे होत; त्यांनी तो सर्व राष्ट्रांना पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हुंदडील; असे एफ्राइमाचे लाखो व मनश्शेचे हजारो आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan