Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 13:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई; तो इस्राएलाचा सरदार झाला; पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई; तो इस्राएलाचा सरदार झाला; पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जेव्हा एफ्राईम बोलत असे, तेव्हा लोक थरथर कापत असत; कारण तो इस्राएलाचा अधिपती होता. पण तो बआल मूर्तीच्या उपासनेचा दोषी झाला आणि मरण पावला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 13:1
26 Iomraidhean Croise  

पण बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणार्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.”


यराबाम एफ्राइमाच्या पहाडी प्रदेशात शखेम नगर मजबूत करून तेथे राहू लागला आणि त्यानंतर तेथून निघून जाऊन पनुएल नगराची त्याने मजबुती केली.


लोक माझे भाषण कान देऊन ऐकत राहत, माझा निर्णय ऐकायला ते स्तब्ध राहत.


माझे बोलणे संपल्यावर ते पुन्हा बोलत नसत; माझे भाषण त्यांना पर्जन्यवृष्टीसारखे होई.


नाशापूर्वी मनुष्याचे अंत:करण गर्विष्ठ असते; आधी नम्रता मग मान्यता.


परमेश्वर म्हणतो, “ह्या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत; म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत; पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो.


अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन. (पासष्ट वर्षे झाली नाहीत तोच एफ्राईम भंग पावेल व त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही.)


जो जो मी बोलावी, तो तो ते माझ्यापासून दूर जात; ते बआलमूर्तींना बली अर्पण करत, कोरीव मूर्तीपुढे धूप जाळत.


आता तिच्या वल्लभांसमक्ष तिची लाज उघडी करीन व माझ्या हातून कोणी तिला सोडवणार नाही.


तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरवणारा व जे सोने, रुपे त्यांनी बआलमूर्तीसाठी वेचले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही.


त्यांनी राजे नेमले आहेत, पण माझ्या विचाराने नेमले नाहीत; त्यांनी अधिपती स्थापले, पण त्यासाठी माझी संमती नव्हती; केवळ नष्ट होण्याकरताच त्यांनी आपणांसाठी आपल्या सोन्यारुप्याच्या मूर्ती केल्या.


मग एफ्राईम वंशाच्या छावणीचे निशाण, त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या दलावर होता.


देश हेरायला मोशेने जे पुरुष पाठवले त्यांची नावे ही होती. नूनाचा मुलगा होशा ह्याचे नाव मोशेने यहोशवा असे ठेवले.


एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा,


कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल; व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”


एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.


कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले;


परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढवण्यास आरंभ करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना कळून येईल.


मग एफ्राइमी लोक जमा होऊन साफोन येथे गेले. ते इफ्ताहाला म्हणाले, “तू अम्मोन्यांशी लढायला गेलास तेव्हा तुझ्याबरोबर येण्यासाठी आम्हांला का नाही बोलावलेस? आम्ही तुझ्या घरासकट तुला जाळून टाकतो.”


तेव्हा एफ्राइमी पुरुष त्याला म्हणाले, “तू आमच्याशी असा का वागलास? तू मिद्यानाशी लढायला निघालास तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस?” अशी ते त्याच्याशी हुज्जत घालू लागले.


शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास तरी तुला इस्राएली कुळांचा नायक केले ना? आणि तू इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan