Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 12:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मिसर देशापासून मी परमेश्वर तुझा देव आहे, उत्सवाच्या दिवसांप्रमाणे मी तुला पुन्हा तंबूत राहायला लावीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मी परमेश्वर तुझा देव, जो मिसर देशापासून तुझ्याबरोबर आहे, नेमलेल्या सणाच्या दिवसाप्रमाणे मी तुला पुन्हा तंबूत वसविणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; तुझ्या नेमलेल्या उत्सवाच्या दिवसात मी तुला पुन्हा तंबूंमध्ये राहवयास लावेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 12:9
22 Iomraidhean Croise  

ते मुलगे मोठे झाले; एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला; तर याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे.


तेव्हा राजा नाथान संदेष्ट्याला म्हणाला, “पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोश कनाथीच्या आत राहत आहे!”


त्याप्रमाणेच त्यांनी पवित्र लेखात सांगितल्याप्रमाणे मांडवांचा सण पाळला आणि दररोज प्रयोजन पडेल तेवढे रोजचे होमबली नियमानुसार अर्पण केले.


कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करता येत नाही; किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही.


मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुला मिसर देशातून बाहेर काढले, तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन;


ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


आपला मळ धुतलेला नसता आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा असा एक वर्ग आहे.


तुम्ही कधी घरेदारे बांधू नका, शेते पेरू नका, द्राक्षांचे मळे लावू नका, त्यांची मालकीही पत्करू नका; तर आपले आयुष्य तंबूत घालवा, म्हणजे ज्या देशात तुम्ही उपरे आहात त्यात तुमचा बहुत दिवस निभाव लागेल.’


पिंजरा पक्ष्यांनी भरलेला असतो तशी त्यांची घरे कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात; म्हणून ते थोर व श्रीमंत झाले आहेत.


इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलावले.


मिसर देशापासून मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्यावाचून अन्य देव तुला ठाऊक नाही, माझ्यावाचून कोणी त्राता नाही.


तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन; आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर1 खिंड देईन; ती आपल्या तारुण्याच्या दिवसांतल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे, माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल.


तुमच्याजवळ खरी तागडी, खरी वजने, खरा एफा2 व खरा हिन2 असावा; ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले तो मी परमेश्वर तुमचा देव आहे;


मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्ही मिसर्‍यांचे दास राहू नये म्हणूनच मी तुम्हांला मिसर देशातून काढून बाहेर आणले; मी तुमची जोखडे मोडून तुम्हांला ताठ मानेने चालवले आहे.


मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले; मी तुझ्यापुढे मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांना पाठवले.


त्यांचे मालक त्यांचा वध करतात व आपणांला निर्दोष समजतात; त्यांची विक्री करणारे म्हणतात की, ‘परमेश्वराचा धन्यवाद होवो; मी श्रीमंत झालो आहे;’ त्यांचे स्वत:चे मेंढपाळ त्यांच्यावर काही दया करत नाहीत.


तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले तोच मी परमेश्वर तुमचा देव आहे; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”


यहूद्यांचा सण म्हणजे मंडपांचा सण जवळ आला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan