Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 12:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 गर्भाशयात असता त्याने आपल्या भावाची टाच धरली; तो आपल्या भरज्वानीत असता देवाबरोबर झगडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 गर्भात असता याकोबाने आपल्या भावाची टाच घट्ट धरली, आणि तरुणपणी देवासोबत झोंबी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्याने गर्भात असता आपल्या भावाची टाच धरली; एका मनुष्य असून त्याने परमेश्वराशी झुंज केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 12:3
14 Iomraidhean Croise  

त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला; एसावाची टाच त्याच्या हाती होती; आणि त्याचे नाव याकोब (टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा) असे ठेवले. तिने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.


त्यामुळे परमेश्वर इस्राएलावर अति कोपायमान झाला; त्याने त्यांना आपल्या दृष्टिआड केले; यहूदाच्या वंशाखेरीज कोणी उरला नाही.


म्हणून परमेश्वराने इस्राएलाच्या सर्व वंशजांचा त्याग करून त्यांना पिडले, त्यांना लुटणार्‍यांच्या हाती दिले व शेवटी त्यांना आपल्या दृष्टीसमोरून घालवून दिले.


शेवटी परमेश्वराने आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या दृष्टिआड केले. त्यांना स्वदेशातून काढून अश्शूरास नेण्यात आले; तेथेच ते आजवर राहत आहेत.


म्हणून मी तुमच्याशी आणखी वाद करीन, मी तुमच्या मुलांशी वाद चालवीन, असे परमेश्वर म्हणतो.


आता तुझा अंत आला आहे; मी आपला संताप तुझ्यावर भडकवीन, तुझ्या करणीप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन.


आता मी आपल्या संतप्त क्रोधाचा तुझ्यावर सत्वर वर्षाव करीन, मी आपल्या क्रोधाची परिपूर्ती तुझ्यावर करीन व तुझ्या आचरणाप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन.


नंतर इस्राएल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर व आपला राजा दावीद ह्यांना शरण येतील; ते शेवटच्या दिवसांत भीतीने कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करतील.” इस्राएलाशी परमेश्वराचा वाद 4 इस्राएल लोकहो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया, व देवज्ञान ही नाहीतशी झाल्यामुळे परमेश्वर ह्या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे.


जसा याजक तसे लोक असे होईल; त्यांच्या आचरणाबद्दल मी त्यांना शासन करीन, त्यांच्या कर्माचे प्रतिफळ त्यांना देईन.


परमेश्वर म्हणतो, “यहूदाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र धिक्कारले आहे, त्यांनी त्याचे विधी पाळले नाहीत; व त्यांचे वाडवडील ज्या खोट्या गोष्टींना अनुसरले त्यांच्या योगे ते बहकले आहेत.


पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका; पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका; परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे; तो इस्राएलाबरोबर वाद करणार आहे.


मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरेवाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मांमुळे नव्हे, तर पाचारण करणार्‍याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा,


Lean sinn:

Sanasan


Sanasan