Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 12:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 गिलाद मूर्तिपूजक बनला आहे ना? तर तो शून्यवत होऊन जाईल; गिल्गालात त्यांनी बैल अर्पण केले; त्यांच्या वेद्या शेतांच्या तासांतील दगडांच्या राशींसारख्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 जर गिलादामध्ये दुष्टता असली तर निश्चितच लोक नालायक आहेत. गिलादात ते बैल अर्पण करतात, त्यांच्या वेद्यांची संख्या शेतातील तासामध्ये असलेल्या दगडाएवढी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 गिलआद दुष्ट आहे काय? त्याचे लोक निरुपयोगी आहेत! ते गिलगालात बैलांचे अर्पण करतात का? त्यांच्या वेद्या नांगरलेल्या शेतातील दगडांच्या ढिगार्‍यासारख्या असतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 12:11
18 Iomraidhean Croise  

एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्‍यांपैकी एक होता; तो अहाबास म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पाऊस पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”


तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे व द्रष्टे ह्यांच्या द्वारे इस्राएल व यहूदा ह्यांना बजावून सांगितले होते की, “तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुमच्या पूर्वजांना जे सगळे नियमशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेष्टे ह्यांच्या द्वारे तुमच्याकडे पाठवले होते त्याला अनुसरून माझ्या आज्ञा व नियम पाळावेत.”


त्या शून्य, उपहासाला पात्र वस्तू होत; त्यांचा समाचार घेऊ लागताच त्या नष्ट होतात.


ते एकंदर सर्व पशुवत व मूर्ख आहेत; मूर्तीपासून घ्यावयाचा बोध म्हटला म्हणजे काष्ठरूप!


कारण प्राचीन काळी तू आपले जू मोडले, आपली बंधने तोडली आणि तू म्हणालीस, ‘मी सेवा करणार नाही.’ आणि तू कसबिणीसारखी प्रत्येक उंच टेकडीवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली ओणवी झालीस.


तर तू आपणांसाठी केलेले देव कोठे आहेत? तुझ्या संकटसमयी ते उठून तुला वाचवतील की काय ते पाहा, कारण हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे.


“मानवपुत्रा, इस्राएल घराण्यास कोडे घाल, हा दृष्टान्त कथन कर;


इस्राएल उफाड्याने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे, त्याला भरपूर फळे येतात; जो जो त्याला जास्त फळे आली तो तो त्याने जास्त वेद्या केल्या; त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारले.


त्यांचे हृदय बेइमान आहे, आता त्यांना प्रायश्‍चित्त मिळालेच पाहिजे; तो त्यांच्या वेद्या मोडून टाकील; तो त्यांचे मूर्तिस्तंभ उद्ध्वस्त करील.


हे इस्राएला, तू जरी जारकर्म केले आहेस तरी यहूदाने अशा पापात पडू नये; गिल्गालास येऊ नका, व बेथ-आवेनास जाऊ नका, परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहू नका.”


गिलाद हे दुष्कर्म्यांचे शहर आहे, त्यावर रक्ताची पावले उमटली आहेत.


कारण एफ्राइमाने पाप करण्यासाठी पुष्कळ वेद्या केल्या आहेत; ह्या वेद्या पापमूलक झाल्या आहेत.


त्यांची सर्व दुष्टता गिल्गालात आहे, तेथेच त्यांच्याविषयी माझ्या ठायी द्वेष उद्भवला; त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे त्यांना मी आपल्या मंदिरातून घालवून देईन; ह्यापुढे मी त्यांच्यावर प्रीती करणार नाही; त्यांचे सर्व सरदार फितुरी आहेत.


“बेथेलास जाऊन पातक करा, गिल्गालास जाऊन पातकाची वृद्धी करा; प्रतिदिवशी सकाळी आपले यज्ञ अर्पा, दर तीन दिवसांनी आपले दशमांश आणा;


परंतु बेथेलास शरण जाऊ नका, गिल्गालात प्रवेश करू नका. पलीकडे बैर-शेब्यास जाऊ नका; कारण गिल्गाल खातरीने बंदिवासात जाईल, व बेथेल शून्यवत होईल.”


जे निरर्थक मूर्तींना भजतात, ते आपल्या दयाघनास सोडून देतात;


परमेश्वर त्यांना म्हणाला, “माझे शब्द ऐका, तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टान्तात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करत असतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan