Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 12:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मी संदेष्ट्यांबरोबर बोललो आहे; मीच दिव्यदर्शनांची रेलचेल केली आहे आणि संदेष्ट्यांच्या द्वारे मी दृष्टान्त देऊन बोध केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मी संदेष्टयांशी देखील बोललो आहे. आणि त्यांना मी पुष्कळ दृष्टांत दिले आहेत, मी त्यांना संदेष्ट्यांद्वारे दाखले दिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मी संदेष्ट्यांबरोबर बोललो, त्यांना अनेक दृष्टान्त दिले आणि त्यांच्याद्वारे दाखले सांगितले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 12:10
29 Iomraidhean Croise  

नंतर पाहा, परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाचा माणूस यहूदातून बेथेल येथे आला; त्या वेळी यराबाम हवन करीत वेदीजवळ उभा होता.


एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्‍यांपैकी एक होता; तो अहाबास म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पाऊस पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”


तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे; कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले; मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.”


तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे व द्रष्टे ह्यांच्या द्वारे इस्राएल व यहूदा ह्यांना बजावून सांगितले होते की, “तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुमच्या पूर्वजांना जे सगळे नियमशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेष्टे ह्यांच्या द्वारे तुमच्याकडे पाठवले होते त्याला अनुसरून माझ्या आज्ञा व नियम पाळावेत.”


तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केलीस व आपल्या आत्म्याने संदेष्ट्यांच्या द्वारे त्यांना बजावत आलास; पण त्यांनी कान दिला नाही म्हणून तू त्यांना अनेक देशांतील लोकांच्या हाती दिलेस.


ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


परमेश्वर म्हणाला, “जा, कुंभाराचे एक मडके विकत घे आणि आपल्याबरोबर लोकांचे व याजकांचे काही वडील घेऊन,


मग जी माणसे तुझ्याबरोबर असतील त्यांच्या डोळ्यांदेखत ते मातीचे मडके फोड;


परमेश्वर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना तुमच्याकडे पाठवत आला, मोठ्या निकडीने पाठवत आला, तरी तुम्ही ऐकले नाही, आपला कान लावला नाही.


तुमचे पूर्वज मिसर देशातून निघाले तेव्हापासून आजवर माझे सर्व सेवक जे संदेष्टे तुमच्याकडे मी पाठवत आलो, त्यांना मोठ्या निकडीने पाठवत आलो;


“मानवपुत्रा, इस्राएल घराण्यास कोडे घाल, हा दृष्टान्त कथन कर;


मी म्हणालो, “अहा! प्रभू परमेश्वरा! लोक माझ्याविषयी म्हणतात, ‘हा दृष्टान्त सांगणारा नव्हे काय?”’


मिसर देशापासून मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्यावाचून अन्य देव तुला ठाऊक नाही, माझ्यावाचून कोणी त्राता नाही.


मग परमेश्वराने मला म्हटले, “इस्राएल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो. त्याप्रमाणे तू पुन्हा जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिच्यावर प्रेम कर.”


ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील.


तुम्ही सात दिवस मांडवात राहावे; जितके जन्मतः इस्राएल आहेत त्यांनी मांडवात राहावे;


तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही; तर मी गुराखी, उंबरांच्या झाडांची निगा राखणारा आहे.


परमेश्वर त्यांना म्हणाला, “माझे शब्द ऐका, तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टान्तात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करत असतो.


‘देव म्हणतो, शेवटल्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील, व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील;


प्रौढी मिरवणे मला भाग पडते; तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरणे ह्यांच्याकडे आता वळतो.


प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan