Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 जो जो मी बोलावी, तो तो ते माझ्यापासून दूर जात; ते बआलमूर्तींना बली अर्पण करत, कोरीव मूर्तीपुढे धूप जाळत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यांना जेवढे बोलविले तेवढे ते माझ्यापासून दूर जात ते बआलास बली आणि मुर्तीस धूप जाळत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 पण त्यांना जितके जास्त बोलाविले, तितके ते माझ्यापासून दूर गेले. त्यांनी बआलापुढे बळी दिले आणि त्यांनी मूर्तीला धूप जाळला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 11:2
28 Iomraidhean Croise  

जी वेदी त्याने बेथेलात बांधली होती तिच्यावर स्वतःच्याच मनाने ठरवलेल्या आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्याने होमबली अर्पण केले; त्याने इस्राएल लोकांसाठी हा सण स्थापला आणि वेदीवर यज्ञबली हवन करून अर्पण केला.


आता जासूद पाठव आणि सर्व इस्राएलास, बआलमूर्तींच्या साडेचारशे संदेष्ट्यांना आणि ईजबेलीच्या पंक्तीला जेवणार्‍या अशेरा मूर्तींच्या चारशे संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर माझ्यापुढे जमव.”


तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केलीस व आपल्या आत्म्याने संदेष्ट्यांच्या द्वारे त्यांना बजावत आलास; पण त्यांनी कान दिला नाही म्हणून तू त्यांना अनेक देशांतील लोकांच्या हाती दिलेस.


तुमच्या दुष्कर्मांचे आणि तुमच्या वाडवडिलांनी पर्वतावर धूप जाळला व टेकड्यांवर माझा अपमान केला त्या दुष्कर्मांचे फळ मी त्यांना देईन,” असे परमेश्वर म्हणतो; “मी आधी त्यांच्या कर्मांचे फळ त्यांच्या पदरी मोजून घालीन.”


तरीपण माझे लोक मला विसरले आहेत, ते व्यर्थतेपुढे धूप जाळतात; त्यांनी त्यांच्या मार्गांत, त्यांच्या प्राचीन मार्गांत त्यांना ठोकर खायला लावले; भर घालून तयार न केलेल्या आडवाटांनी त्यांना जाण्यास लावले.


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, यहूदाचे लोक व यरुशलेमकर ह्यांना जाऊन सांग की माझी वचने ऐकण्याचा बोध तुम्ही का घेत नाही?”


तरीपण अन्य देवांना धूप जाळण्याचे सोडून देऊन आपल्या दुष्टतेपासून वळण्याचे ते ऐकेनात व आपला कान देईनात.


माझ्या लोकांचा माझ्यापासून मागे फिरण्याकडे कल आहे, आणि त्यांना बोलावले असता कोणी उठून दृष्टी वर करीत नाहीत.


बआलमूर्तींच्या दिवसांत ती त्यांच्यापुढे धूप जाळत असे, ती नथ व अलंकार ह्यांनी नटून आपल्या वल्लभांच्या मागे जात असे; ती मला विसरली, त्या दिवसांचे प्रतिफळ मी तिला देईन, असे परमेश्वर म्हणतो.


ते पर्वतांच्या माथ्यांवर यज्ञयाग करतात व टेकड्यांवर ओक, हिवर व एला ह्या झाडांची छाया चांगली असल्यामुळे त्यांच्याखाली धूप जाळतात; म्हणून तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात.


एफ्राईम मूर्तीवर आसक्त झाला आहे, त्याचे नाव सोडून द्या.


तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका; त्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी पुकारून सांगितले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपल्या कुमार्गांपासून व आपल्या दुष्कर्मांपासून परावृत्त व्हा; पण त्यांनी माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही, असे परमेश्वर म्हणतो.


पण ते ऐकेनात, त्यांनी मान ताठ केली व ऐकू नये म्हणून कान बंद केले.


यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!


निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.


अहो ‘ताठ मानेच्या’ आणि ‘हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो,’ तुम्ही तर ‘पवित्र आत्म्याला’ सर्वदा ‘विरोध करता;’ जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही.


मग इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले; बआलीम व अष्टारोथ ह्या दैवतांची आणि अराम, सीदोन, मवाब, अम्मोनी व पलिष्टी ह्या सर्वांच्या दैवतांची ते सेवा करू लागले; त्यांनी परमेश्वराचा त्याग केला; त्याची सेवा ते करीनात,


परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल व अष्टारोथ ह्यांची सेवा केली;


इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बआल व अशेरा ह्या मूर्तींची सेवा करू लागले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan