Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 11:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मिसर देशातून पक्षी व अश्शूर देशातून पारवे येतात तसे ते थरथर कापत येतील, व मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 ते मिसरातून पक्षासारखे आणि अश्शूरातून कबुतरा प्रमाणे थरथरत येतील मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 पक्ष्यांच्या थरथरणाऱ्या थव्याप्रमाणे ते इजिप्तकडून येतील, पारव्यांप्रमाणे पंख फडफडत अश्शूरहून येतील. आणि मी त्यांना त्यांच्या घरी स्थायिक करेन,” असे याहवेह घोषणा करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 11:11
17 Iomraidhean Croise  

त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्‍यांदा सोडवील.


जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात तसे जे उडत आहेत ते कोण?


ते येऊन सीयोनेच्या माथ्यावर आनंदाने गातील; परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, नवा द्राक्षारस, ताजे तेल व गुरामेंढरांचे वत्स ह्यांकडे लोटतील; त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल; ह्यापुढे ते म्लान होणार नाहीत.


मळ्यातील झाडे फलद्रूप होतील, भूमी आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे वसतील; मी त्यांच्यावरील जोखडांची बंधने तोडून ज्यांनी त्यांच्याकडून दास्य करून घेतले त्यांच्या हातून त्यांना सोडवीन तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.


ते ह्यापुढे परराष्ट्रांना भक्ष्य होणार नाहीत; वनपशू त्यांना फाडून खाणार नाहीत; तर ते निर्भय वसतील, कोणी त्यांना भीती घालणार नाही.


तू त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, इस्राएलवंशज ज्या राष्ट्रांत गेले आहेत त्यांतून मी त्यांना काढून व चोहोंकडून गोळा करून स्वदेशी नेईन;


जो देश माझा सेवक याकोब ह्याला मी दिला व ज्यात तुमचे पूर्वज राहत असत त्यात ते वस्ती करतील; तेथे ते व त्यांचे पुत्रपौत्र सर्वकाळ वस्ती करतील; माझा सेवक दावीद त्यांच्यावर सर्वकाळचा अधिपती होईल.


एफ्राईम एखाद्या खुळ्या निर्बुद्ध पारव्यासारखा आहे; ते मिसराला हाक मारतात; अश्शूराकडे धाव घेतात.


पण निभावलेले सीयोन डोंगरावर राहतील; तो पवित्रस्थान असा होईल; याकोबाचे घराणे आपल्या वतनाचा ताबा घेईल.


मी त्यांना मिसर देशातून माघारी आणीन; अश्शूर देशातून त्यांना एकत्र करीन; गिलाद व लबानोन ह्यांच्या भूमीवर त्यांना आणीन; त्यांना जागा पुरायची नाही.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो : मी आपल्या लोकांचा उगवतीकडून व मावळतीकडून उद्धार करीन;


मी त्यांना घेऊन येईन व ते यरुशलेमेत वस्ती करतील आणि सत्याने व न्यायीपणाने ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan