Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




होशेय 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 हे इस्राएला, गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळेपासून तू पाप करीत आला आहेस; तेथेच ते अद्यापि आहेत; गिबात दुष्कर्म्यांबरोबर झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 इस्राएला, गिबाच्या दिवसापासून तू पाप करत आहेस; तू तिथेच राहिला आहेस गिबाच्या दुष्टांसोबत झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “हे इस्राएला, गिबियाहतील दिवसापासून तू पाप करीत आला आहेस आणि तू तिथेच राहिला. गिबियाहच्या दुष्कृत्य करणाऱ्या विरुद्ध पुन्हा युद्ध भडकणार नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




होशेय 10:9
12 Iomraidhean Croise  

पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले;


परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, “मानवामुळे मी इत:पर भूमीला कधीही शाप देणार नाही; कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात; तर मी आताच्याप्रमाणे पुन्हा अखिल जिवांचा कधीही संहार करणार नाही.


मला वाटेल तेव्हा मी त्यांना शासन करीन; त्यांना त्यांच्या दोन्ही पातकांस्तव शासन करण्यास त्यांच्याविरुद्ध राष्ट्रे गोळा होतील.


इस्राएलाचे पाप म्हणजे आवेनाची उच्च स्थाने नाश पावतील; त्यांच्या वेद्यांवर काटेकुसळे व काटेरी झुडपे उगवतील; ते पर्वतांना म्हणतील, ‘आम्हांला झाकून टाका, टेकड्यांना म्हणतील, आमच्यावर पडा.’


गिबात शिंग फुंका, रामात कर्णा वाजवा; तुझ्यामागे, हे बन्यामिना! असा रणशब्द बेथ-आवेन येथे करा.


गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखा त्यांनी अति भ्रष्टाचार केला आहे; तो त्यांचा अधर्म स्मरतो; तो त्यांच्या पापांचे प्रतिफळ देतो.


आणि गिब्यातल्या लोकांनी रात्री घराला गराडा घातला; माझा खून करण्याचा त्यांचा बेत होता, आणि त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला व ती मेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan